सावकारांकडून ५८८ जणांनी घेतले १२७ कोटींचे कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:10 AM2021-01-08T06:10:07+5:302021-01-08T06:10:07+5:30
खरीप व रबी हंगामात शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसह राष्ट्रीयकृत बॅंकांकडून पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येते. तथापि, जाचक अटी व ...
खरीप व रबी हंगामात शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसह राष्ट्रीयकृत बॅंकांकडून पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येते. तथापि, जाचक अटी व कर्ज मिळण्यास दिरंगाई तसेच अन्य कारणांमुळे अनेकजण परवानाधारक तसेच अनधिकृत सावकाराकडून कर्ज घेतात. जिल्ह्यात ३९ परवानाधारक सावकार आहेत. सर्वाधिक परवानाधारक सावकार रिसाेड व कारंजा तालुक्यात प्रत्येकी ११ आहेत. शेतकऱ्यांसह अन्य नागरिकही सावकारांकडून कर्जाची उचल करतात. सन २०२० या वर्षात जिल्ह्यातील ५८८ जणांनी परवानाधारक सावकारांकडून १२७. ७१ कोटींचे कर्ज घेतले आहे. याशिवाय परवाना नसलेल्या सावकाराकडूनदेखील कर्जाची उचल केली जाते.
००००
वर्षात ९२ आत्महत्या
२०२० या वर्षात जिल्ह्यातील ९२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. सततची नापिकी, कर्ज परतफेडीची चिंता यासह अन्य कारणांमुळे एकूण ९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
०००
अनधिकृत सावकारी
जिल्ह्यात अनधिकृत सावकारांकडूनदेखील कर्जाची उचल केली जाते. गत वर्षात अवैध सावकारीप्रकरणी पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे.