वाशिम जिल्ह्यात शंभर चाचण्यांमागे ६ बाधित; कोरोना रुग्णांत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 03:46 PM2020-11-09T15:46:34+5:302020-11-09T15:46:42+5:30
शंभरामागे ६ व्यक्तींना कोरोना संसगार्ची बाधा होत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात कोरोना संसगार्चे प्रमाण सातत्याने घटत आहे. जिल्ह्यात ६ नोव्हेंबरपर्यंत ५७६६ लोकांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी ५४६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर १४३ लोकांचा मृत्यू झाला असून, केवळ १५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात दरदिवशी ३०० कोरोना चाचण्या घेतल्या जात असून, त्यापैकी १८ अर्थात शंभरामागे ६ व्यक्तींना कोरोना संसगार्ची बाधा होत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात केवळ एक रुग्ण कोरोना बाधित आढळला. त्यानंतर महिनाभराने १२ मे रोजी दुसरा कोरोनाबाधित आढळला. याच महिन्यात आणखी सहा जण बाधित आढळले. जून महिन्यापासून कोरोना संसर्ग हळूहळू पसरू लागला आणि ऑगस्ट महिन्यापासून कोरोना संसर्गाचा वेग कमालीचा वाढला. सप्टेंबर महिन्यात, तर कहरच झाला आणि कोरोना संसर्गाची संख्या चार हजारांच्यावर पोहोचली. वाढता कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने व्यापक उपाय केले. शासनाच्या निदेर्शानुसार जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान राबवून चाचण्यांचे प्रमाण वाढविले. त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपासून कोरोना संसगार्चे प्रमाण कमी होत गेले.
त्यात ६ नोव्हेंबरपर्यंत ५७५४ लोकांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी ५४३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर १४३ लोकांचा मृत्यू झाला असून, केवळ १४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, दिवसाला जिल्हाभरात ३०० व्यक्तींच्या कोरोना चाचण्या होत आहेत. त्यापैकी १८ लोक सरासरी बाधित आढळत असल्याने चाचण्यांतील शंभरामागे ६ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग असल्याचे स्पष्ट होते.
(प्रतिनिधी)