६ ग्रामपंचायती ओडीएफ प्लस घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:47 AM2021-08-18T04:47:39+5:302021-08-18T04:47:39+5:30

हागणदारी मुक्तीसह लोकसहभाग व ग्रामपंचायतच्या पुढाकारातून सांडपाणी व घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचे काम या ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आली आहेत. प्रत्येकी एक ...

6 Gram Panchayats declared ODF Plus | ६ ग्रामपंचायती ओडीएफ प्लस घोषित

६ ग्रामपंचायती ओडीएफ प्लस घोषित

Next

हागणदारी मुक्तीसह लोकसहभाग व ग्रामपंचायतच्या पुढाकारातून सांडपाणी व घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचे काम या ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आली आहेत. प्रत्येकी एक याप्रमाणे ६ तालुक्यांतील ६ ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील साखरा, मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा, रिसोड तालुक्यातील रिठद, मंगरुळपीर तालुक्यातील लाठी, मानोरा तालुक्यातील कोलार आणि कारंजा तालुक्यातील इंझा या गावांचा समावेश आहे. वाशिम जिल्हा हा मार्च २०१८ मध्ये ओडीएफ (हागणदारी मुक्त) घोषित झाला. त्यानंतर जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनचा टप्पा २ अर्थात ओडीएफ-प्लसची अंमलबजावणी करण्यात येत असून सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता टिकविण्यासाठी ग्रामपंयायतीच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनोद वानखडे यांनी सांगितले.

००००००

ओडीएफ प्लस म्हणजे काय?

ओडीएफ प्लस म्हणजे हागणदारीमुक्त अधिक वैयक्तिक शौचालयाचा वापर, गावातील सांडपाणी व घनकचरा याचे व्यवस्थापन, शाळा- अंगणवाडी व सर्व सार्वजनिक संस्थांमध्ये स्वच्छतेविषयी सुविधा, प्रत्येक घरी नळाच्याद्वारे पिण्याचे पाणी आदी सुविधा गावांमध्ये असणे अपेक्षित आहे. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ओडीएफ प्लसअंतर्गत कामे करण्यात येणार असून लवकरच जिल्हा ओडीएफ प्लस घोषित करण्यात येणार असल्याचे डॉ. विनोद वानखडे यांनी सांगितले.

Web Title: 6 Gram Panchayats declared ODF Plus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.