आरटीई प्रवेशाच्या ६० टक्के जागा रिक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:25 AM2021-07-12T04:25:30+5:302021-07-12T04:25:30+5:30

जिल्ह्यात आरटीईअंतर्गत १०३ शाळांचा समावेश होतो. या सर्व शाळांत मिळून २५ टक्के मोफत प्रवेशाच्या ७१८ जागा आहेत. या जागांसाठी ...

60% of RTE admissions are vacant | आरटीई प्रवेशाच्या ६० टक्के जागा रिक्तच

आरटीई प्रवेशाच्या ६० टक्के जागा रिक्तच

Next

जिल्ह्यात आरटीईअंतर्गत १०३ शाळांचा समावेश होतो. या सर्व शाळांत मिळून २५ टक्के मोफत प्रवेशाच्या ७१८ जागा आहेत. या जागांसाठी १११९ पालकांनी त्यांच्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज केले होते. त्यापैकी ६३० विद्यार्थ्यांच्या अर्जांची लॉटरी पद्धतीने प्रवेशासाठी निवड झाली असून, ३३० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.

--

तालुकानिहाय शाळा आणि जागा

तालुका - शाळा - जागा - रिक्त जागा

कारंजा - १६ - १६२ - १०२

मालेगाव - १७ - ६७ - ३०

मंगरुळ - १७ - १५० -१०९

मानोरा - ०७ -४९ -२४

रिसोड - १८ - ८९ - २५

वाशिम - २८ - २०१ - ९८

---------------------------

१) आरटीईअंतर्गत जिल्ह्यात शाळांची नोंद १०३

२) एकूण जागा ७१८

३) शिल्लक जागा ३८८

दुसऱ्यांदा मुदतवाढ

आरटीई प्रवेश प्रक्रिया महिनाभरापासून सुरू आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ६५ टक्के प्रवेश झाल्याने पुन्हा २३ जुलैपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. नंतर ती ९ जुलैपर्यंत करण्यात आली होती.

-------

शाळांचे पैसे सरकार देणार कधी

कोट : आरटीईअंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची यादी शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून शासनाकडून निधीच नसल्याने आम्हाला रक्कम मिळालेली नाही.

-राहुलदेव मनवर,

संस्थाध्यक्ष, मंगरुळपीर

------

पालकांच्या अडचणी काय

१) कोट : आरटीई मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत मुलाचा पहिल्या वर्गात प्रवेश करण्यासाठी अर्ज केला आहे. पहिल्या लॉटरीत निवड झाली नाही. त्यामुळे दुसऱ्या निवडीची प्रतीक्षा आहे.

- श्रीकांत मुंजे, पालक

-------

२) कोट : आरटीईअंतर्गत मुलाच्या प्रवेशासाठी अर्ज केला आणि पहिल्या यादीतच त्याची निवड झाली; परंतु कोरोना संसर्गामुळे आवश्यक कागदपत्रे मिळविण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.

-बुरान बेनिवाले, पालक

-------------

कोट : आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यात पहिल्या लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू आहेत. अद्याप ४० टक्क्यांवर विद्यार्थ्याचे प्रवेश राहिले असून, या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करावेत.

- गजाननराव डाबेराव,

प्रभारी उपशिक्षणाधिकारी, जि. प., वाशिम

Web Title: 60% of RTE admissions are vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.