जिजाऊ जयंतीनिमित्त ६०० किमी ‘सायकल वारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:44 AM2021-01-13T05:44:03+5:302021-01-13T05:44:03+5:30
वाशिम सायकलस्वार ग्रुप व वाशिम रांदीनियर ग्रुप, सायकलस्वार हे सायकल वारीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण, आरोग्याचा संदेश देत आहे. ९ ...
वाशिम सायकलस्वार ग्रुप व वाशिम रांदीनियर ग्रुप, सायकलस्वार हे सायकल वारीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण, आरोग्याचा संदेश देत आहे. ९ ते १२ जानेवारीदरम्यान आयोजित सायकल ब्रेवेट स्पर्धेच्या माध्यमातून २० सायकलस्वारांनी वाशिम-पांढुर्णा (मध्य प्रदेश) असे ६०० किमीचे अंतर कापले. यापैकी १४ सायकलस्वारांनी ४० तासांचे निर्धारित अंतर १ तासाआधीच पूर्ण केले. या स्पर्धेचा प्रारंभ ९ जानेवारी रोजी पाटणी चौक येथून पहाटे ४ वाजता झाला. या स्पर्धेत २० जणांनी सहभाग घेतला होता. मंगरूळपीर, कारंजा, अमरावती, मोर्शी, वरुड, पांढुर्णा (मध्य प्रदेश) सावनेर व परत वाशिम अशी ही सायकल वारी होती. मोहीम समाप्तीनंतर वाशिम येथे आदेश कहाते, दीपक एकाडे, नगरसेवक राहुल तुपसांडे, अॅड. नंदकिशोर पाटील, डॉ. भरत सातपुते यांच्यासह मान्यवरांनी सायकलस्वारांचे स्वागत केले. या स्पर्धेत सहभागी ९ युवक सुपर रांदीनियर पदकाचे मानकरी ठरले आहेत. पुढील १०० कि.मी.ची ब्रेवेट पॉप्युलर स्पर्धा १७ जानेवारी रोजी वाशिम येथे होणार असून, या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. गेल्या ५ वर्षांपासून चेतन शर्मा हे वाशिम रांदीनियर ग्रुपच्या माध्यमातून हा उपक्रम राबवित आहेत.