जिजाऊ जयंतीनिमित्त ६०० किमी ‘सायकलवारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 04:26 PM2021-01-12T16:26:52+5:302021-01-12T16:27:02+5:30
Washim News वाशिम-पांढुर्णा (मध्यप्रदेश) असे ६०० किमीचे अंतर सायकलने कापून यापूर्वीचे विक्रम मोडीत काढले.
वाशिम - गत चार वर्षांपासून सायकलव्दारे पर्यावरण जनजागृती करणाºया वाशिम सायकलस्वार ग्रूप व वाशिम रॉदीनर ग्रूपचे सदस्य तसेच सायकलस्वारांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त ९ ते १२ जानेवारी या दरम्यान वाशिम-पांढुर्णा (मध्यप्रदेश) असे ६०० किमीचे अंतर सायकलने कापून यापूर्वीचे विक्रम मोडीत काढले.
वाशिम सायकलस्वार ग्रूप व वाशिम रॉदीनर ग्रूप, सायकलस्वार हे सायकलवारीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण, आरोग्याचा संदेश देत आहे. ९ ते १२ जानेवारी या दरम्यान आयोजित सायकल ब्रेवेट स्पर्धेच्या माध्यमातून २० सायकलस्वारांनी वाशिम-पांढुर्णा (मध्यप्रदेश) असे ६०० किमीचे अंतर कापले. यापैकी १४ सायकलस्वारांनी ४० तासांचे निर्धारीत अंतर १ तासाआधीच पूर्ण केले. या स्पर्धेचा प्रारंभ ९ जानेवारी रोजी स्थानिक पाटणी चौक येथून पहाटे ४ वाजता करण्यात आला. या स्पर्धेत २० जणांनी सहभाग घेतला होता. मंगरुळपीर, कारंजा, अमरावती, मोर्शी, वरुड, पांढुर्णा (मध्यप्रदेश) सावनेर व परत वाशिम अशी ही सायकलवारी होती. मोहीम समाप्तीनंतर वाशिम येथे आदेश कहाते, दिपक एकाडे, नगरसेवक राहुल तुपसांडे, अॅड. नंदकिशोर पाटील, डॉ. भरत सातपुते यांच्यासह मान्यवरांनी सायकलस्वारांचे स्वागत केले. या स्पर्धेत सहभागी ९ युवक सुपर रांदीनियर पदकाचे मानकरी ठरले. पुढील १०० कि.मी. ची ब्रेवेट पॉप्युलर स्पर्धा १७ जानेवारी रोजी वाशिम येथे होणार असून या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले. गेल्या ५ वर्षापासून चेतन शर्मा हे वाशिम रांदीनियर ग्रुपच्या माध्यमातून हा उपक्रम राबवित आहेत.