वाशिम जिल्ह्यात ६० हजार गावरान गायींवर होणार कृत्रीम रेतनाचा प्रयोग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 03:06 PM2019-05-11T15:06:54+5:302019-05-11T15:07:14+5:30
गावरान गार्इंच्या गर्भात उच्च दर्जाच्या गार्इंचे विर्य सोडून दर्जेदार व अधिक दुध देणाºया गार्इंच्या प्रजाती जन्माला आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे.
पशुसंवर्धन विभागाकडून जागर : जिल्ह्यात ६२ ठिकाणी सुविधा उपलब्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखल्या जाणाºया दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरित गाई, देशी दुधाळ गाई व म्हशी पाळल्या जातात. दरम्यान, प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञान वापरून हा व्यवसाय निश्चितपणे शाश्वत धंदा म्हणून नावारूपास येण्यासोबतच आर्थिकदृष्ट्या परवडणारा देखील ठरू शकतो. यासाठी गावरान गार्इंच्या गर्भात उच्च दर्जाच्या गार्इंचे विर्य सोडून दर्जेदार व अधिक दुध देणाºया गार्इंच्या प्रजाती जन्माला आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे. अशा पद्धतीने जिल्ह्यातील ६० हजार गार्इंवर कृत्रीम रेतनाचा प्रयोग करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
कृत्रीम रेतनाकरिता अतिशय उच्च प्रजातीच्या देशी, विदेशी वळूंचे वीर्य शास्त्रीय पद्धतीने गोळा केले जाते. त्याच्या अनेक चाचण्या घेऊन ते गोठविले जाते. प्रत्येक चाचणीमध्ये सिद्ध ठरलेले वीर्य गावठी व कमी उत्पादन क्षमता असलेल्या गाई, म्हशीच्या गर्भाशयात कृत्रीम पद्धतीने सोडले जाते. या पद्धतीच्या संयोगातून निर्माण होणारी वासरे ही चांगल्या प्रतीची व भरपूर दूध उत्पादन देणारी असतात. अशा पद्धतीने उच्च गुणवत्तेची नवीन जात किंवा स्थानिक गाईचे किंवा म्हशीचे रुपांतरण तुलनेने अधिक प्रमाणात दूध देणाºया जातीमध्ये करता येते व त्यामुळे पशुपालकांच्या उत्पन्नात भरीव वाढ होते. ही बाब लक्षात घेवून वाशिम जिल्ह्यातील सुमारे ६० हजार गावरान गार्इंवर कृत्रीम रेतनाचा प्रयोग केला जाणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील ६२ पशुचिकित्सालयांमध्ये सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयुक्त भुवनेश बोरकर यांनी केले आहे.