जलयुक्त शिवारची ६०३ कामे पूर्ण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 07:26 PM2017-08-16T19:26:44+5:302017-08-16T19:27:40+5:30
वाशिम - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये आतापर्यंत १२० गावांत ६०३ कामे पूर्ण झाली आहेत.
ठळक मुद्देकोरड्या दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे२०१५-१६ व २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात ३४९ गावात ६ हजार ८७८ कामे पूर्ण२०१७-१८ मध्ये आतापर्यंत १२० गावांत ६०३ कामे पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये आतापर्यंत १२० गावांत ६०३ कामे पूर्ण झाली आहेत.
कोरड्या दुष्काळावर मात म्हणून शासनातर्फे जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येत आहेत. याच उद्देशाने तीन वर्षांपूर्वी शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. जलयुक्त शिवार अभियानातून सन २०१५-१६ व सन २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात ३४९ गावात ६ हजार ८७८ कामे पूर्ण झाली आहेत. तसेच २०१७-१८ मध्ये आतापर्यंत १२० गावांत ६०३ कामे पूर्ण झाली आहेत.