वाशिम जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी ६१ नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 01:50 PM2019-03-10T13:50:50+5:302019-03-10T13:51:17+5:30

वाशिम: जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक येत्या २४ मार्च रोजी होऊ घातली आहे. यात मालेगाव तालुक्यातील १४ आणि मालेगाव तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

61 nominations for the post of Sarpanch of 19 Gram panchayats in Washim district | वाशिम जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी ६१ नामांकन

वाशिम जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी ६१ नामांकन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक येत्या २४ मार्च रोजी होऊ घातली आहे. यात मालेगाव तालुक्यातील १४ आणि मालेगाव तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकीत नामांकन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी ९ मार्च रोजीपर्यंत सरपंच पदासाठी ६१, तर सदस्य पदासाठी २९४ नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. 
जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक येत्या २४ मार्च रोजी होऊ घातली आहे. यात मालेगाव तालुक्यातील अमाना, पांगरी नवघरे, मुसळवाडी, कुत्तरडोह, खडकी इजारा या ५ ग्रामपंचायतींचा, तर मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी, कार्ली, सोमेश्वर नगर, पाळोदी, उमरी बु., उमरी खुर्द, बोरव्हा, चौसाळा, दापुरा बु., दापुरा खुर्द, ढोणी, फुलउमरी, गिरोली आणि कोलार या १४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या १९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी १९, तर सदस्य पदांसाठी २९४ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अर्जांची छानणी ११ मार्चला होणार असून, त्यानंतर १३ मार्च ही नामांकन अर्ज मागे घेण्याची शेवटची तारिख आहे. या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष २४ मार्चला मतदान होणार असून, दुसºया दिवशी २५ मार्चला मतमोजणी होणार आहे.  दरम्यान, सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्यात येत असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मानोरा तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी ४७, तर सदस्य पदांसाठी २०४ आणि मालेगाव तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी २४, तर सदस्य पदासाठी ९० नामांकन अर्जांचा समावेश आहे. नामांकन मागे घेण्याच्या तारखेनंतर अर्थात १३ मार्च रोजी प्रत्यक्ष किती उमेदवार रिंगणात राहणार ते स्पष्ट होणार आहे.

Web Title: 61 nominations for the post of Sarpanch of 19 Gram panchayats in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.