पाणीदार गावासाठी कारंजा तालुक्यातील ६२ वर्षीय निसार खाँ यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 04:43 PM2018-05-08T16:43:47+5:302018-05-08T16:43:47+5:30

वाशिम: कारंजा तालुक्यातील ढंगारखेड गटग्रामपंचायतचे सदस्य ६२ वर्षीय निसार खाँ, जब्बार खॉ, हे ग्रामपंचायतमधील शहादतपूर गाव पाणीदार करण्यासाठी धडपड करीत आहेत.

62-year-old Nisar Khan work for water conservation | पाणीदार गावासाठी कारंजा तालुक्यातील ६२ वर्षीय निसार खाँ यांची धडपड

पाणीदार गावासाठी कारंजा तालुक्यातील ६२ वर्षीय निसार खाँ यांची धडपड

Next
ठळक मुद्देनिसार खॉ जब्बार खॉ, हे ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक कारंजा तालुक्यातील ढंगारखेड येथील रहिवासी आणि ग्रामपंचायत सदस्य आहेत. वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांतील वॉटर हिरोंना प्रशिक्षणादरम्यान हायड्रोमार्कर बनविण्याची प्रक्रिया प्रात्यक्षिकाद्वारे शिकविली जाते.आता याच हायड्रोमार्करच्या आधारे ते गावकºयांना कामांचे योग्य नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत.

वाशिम: कारंजा तालुक्यातील ढंगारखेड गटग्रामपंचायतचे सदस्य ६२ वर्षीय निसार खाँ, जब्बार खॉ, हे ग्रामपंचायतमधील शहादतपूर गाव पाणीदार करण्यासाठी धडपड करीत आहेत. गावकºयांना प्रोत्साहित करून स्वत: पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षण घेऊन ते श्रमदानात सक्रीय आहेत. उन्हातान्हात गावकºयांना कामाचे योग्य नियोजनासाठी मार्गदर्शन करण्यासह श्रमदान करण्याची त्यांची जिद्द सर्वांना प्रेरित करीत आहे. 
निसार खॉ जब्बार खॉ, हे ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक कारंजा तालुक्यातील ढंगारखेड येथील रहिवासी आणि ग्रामपंचायत सदस्य आहेत. गटग्रामपंचायतमधील शहादतपूर या गावांत जलसंधारणाच्या कामाची गरज असल्याचे त्यांना माहित होते.  त्यामुळे वॉटर कप स्पर्धेच्या यंदाच्या पर्वाची घोषणा झाली त्याचवेळी त्यांनी या स्पर्धेची माहिती सरपंच यांना दिली व शहादतपूर गाव स्पर्धेत सहभागी करून घेतले. या स्पर्धेच्या प्रशिक्षणासाठी ते स्वत: सरपंच व गावकºयांना सोबत घेऊन गेले. स्पर्धा समजून घेतली. प्रशिक्षणादरम्यान त्यांच्या एका मित्राचा मृत्यु झाला; परंतु परत गेलो तर मित्राचे अंतिम संस्कार हाती लागणार नाहीत आणि प्रशिक्षणही पूर्ण होणार नाही, ही बाब ओळखून परत गावी न जाता प्रशिक्षण पूर्ण केले. तेव्हापासून ते रोज शहादतपूर येथे श्रमदान करतात व गावकºयांना प्रोत्साहन देतात. गावात रोपवाटिका तयारणे, माती परिक्षण नमुने गोळा करणे, जलबचतीची माहिती जमा करणे, या सर्व कामांत त्यांचे मोलाचे सहकार्य आहे. त्यातच पाणलोटाची कामे करताना लागणारे अत्यंत महत्वाचे उपकरण म्हणजे हायड्रोमार्कर होय. जमिनीचा उतार मोजणे, समपातळी रेषा आखणे, उभे अंतर, आडवे अंतर यासारख्या गोष्टी हव्या असतील तर सहज हे हायड्रोमार्कर या गोष्टी मिळवून देतो. पाणी फाऊंडेशनच्यावतीने वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांतील वॉटर हिरोंना प्रशिक्षणादरम्यान हायड्रोमार्कर बनविण्याची प्रक्रिया प्रात्यक्षिकाद्वारे शिकविली जाते. त्यामुळे निसार खाँ यांनी हायड्रोमार्कर बनविण्याची प्र्रक्रिया समजून घेती आणि ते बनविले. आता याच हायड्रोमार्करच्या आधारे ते गावकºयांना कामांचे योग्य नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत.

Web Title: 62-year-old Nisar Khan work for water conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.