‘म्युकरमायकोसिस’ने ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:41 AM2021-05-13T04:41:39+5:302021-05-13T04:41:39+5:30

वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अधिक गंभीर झाले असतानाच ‘म्युकरमायकोसिस’ हा संसर्गजन्य आजारही येऊन ठेपला आहे. सिटीचा ...

A 62-year-old woman died of mucous mycosis | ‘म्युकरमायकोसिस’ने ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू

‘म्युकरमायकोसिस’ने ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू

Next

वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अधिक गंभीर झाले असतानाच ‘म्युकरमायकोसिस’ हा संसर्गजन्य आजारही येऊन ठेपला आहे. सिटीचा स्कोअर २२ आणि आरटीपीसीआरचा अहवाल पाॅझिटिव्ह असलेल्या ६२ वर्षीय महिलेचा ११ मे रोजी रात्री दोन वाजता ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराने स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने जिल्हाभरात खळबळ माजली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रिसोड तालुक्यातील मोप येथील भागाबाई रामचंद्र शिरभाव (६२) या महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने ती २९ एप्रिल रोजी वाशिम येथील जिल्हा कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल झाली होती. सिटी स्कॅन चाचणीचा स्कोअर २२ होता. त्यामुळे परिस्थिती गंभीर होती. अशात ११ मे रोजी सदर महिलेच्या डोळ्याला अचानक सूज आली. संबंधित डाॅक्टरांनी तपासणी करून ‘म्युकरमायकोसिस’ असल्याचे निदान केले आणि तिला अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र यावेळी संबंधित महिलेसोबत कोणीही पुरुष नातेवाईक उपस्थित नव्हता. त्यामुळे तातडीने अकोला येथे हलविणे शक्य झाले नाही. अशात रात्री दोन वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनापाठोपाठ जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’ हा आजारही दाखल झाल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्वतोपरी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

....................

कोट :

मोप येथील ६२ वर्षीय कोरोना बाधित महिलेस ‘म्युकरमायकोसिस’ जडल्याचे निदान ११ मे रोजी झाले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्याचा निर्णय घेतला; मात्र सोबत कोणीही पुरुष नातेवाईक नसल्याने त्यास थोडा विलंब झाला. अशात रात्री दोन वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तथापि, या आजाराने ग्रस्त असलेला इतर कोणी रुग्ण खासगी दवाखान्यांमध्ये भरती आहे का, याची माहिती घेतली जात आहे. नागरिकांनीही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

- डाॅ. मधुकर राठोड

जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम

Web Title: A 62-year-old woman died of mucous mycosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.