अहिल्याबाई होळकर सभागृहासाठी ६२.५३ लाखाचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 02:48 PM2019-01-13T14:48:46+5:302019-01-13T14:49:01+5:30
शेलुबाजार (वाशिम) : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरावर सांस्कृतिक सभागृह निर्माण करण्यासाठी खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या माध्यमातून शेलूबाजार येथे ६२ लाख ५३ हजार रुपये खर्चाच्या सांस्कृतिक सभागृह कामाला मंजुरात मिळाल्याची माहीती पंचायत समिती सदस्य विलास लांभाडे यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क

राज्य शासनाकडे चालू आर्थिक वर्षांत लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या गावांतर्गत मूलभूत सुविधा योजनेंतर्गत जुलै २०१८ च्या पावसाळी अधिवेशनात १०० कोटी इतकी पूरक मागणी मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी ४० कोटी इतका निधी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ सभागृह बांधकामासाठी राखून ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याच योजने अंतर्गत शेलूबाजार येथे सभागृहाच्या बांधकामासाठी शासनाच्या निकषाप्रमाणे जागा उपलब्ध असल्याने ६२ लाख ५३ हजार रुपयाचा निधी मंजुर झाला आहे. सभागृहाचे क्षेत्रफळ १२५ चौरस मिटर इतके असून यामध्ये विद्युतीकरण, वॉटर हार्वेस्टिंग, पाणीपुरवठा, आकस्मिक निधी, संरक्षक भिंत, प्रवेशव्दार, अंतर्गत रस्ते, सौर पथदिवे, व पाण्याचे पंप आदी बाबीचा सदर अंदाजपत्रकात समावेश केला आहे. येथील धनगर समाजासाठी आजपर्यंत सामाजिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कोणत्याच प्रकारची व्यवस्था नव्हती. त्यामुळे धनगर समाज बांधवांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत होता, मात्र खासदार डॉ विकास महात्मे यांच्या माध्यमातून प्रथमच येवढ्या मोठ्या प्रमाणात समाज बांधवासाठी निधी मंजूर करण्यात आल्याने धनगर समाज बांधवात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अशी माहीती पंचायत समिती सदस्य विलास लांभाडे यांनी दिली.