सुजलाम्, सुफलाम् अंतर्गत ६५ हजार घनमीटरची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:53 PM2018-12-22T12:53:44+5:302018-12-22T12:54:26+5:30

वाशिम: जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम्, सुफलाम् अभियानांतर्गत गत आठवड्यापर्यंतच ६४७३८.६७ घनमीटर आकाराची जलसंधारण कामे करण्यात आली आहेत.

65 thousand cubic meters of work under Sujlam suflam | सुजलाम्, सुफलाम् अंतर्गत ६५ हजार घनमीटरची कामे

सुजलाम्, सुफलाम् अंतर्गत ६५ हजार घनमीटरची कामे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम्, सुफलाम् अभियानांतर्गत गत आठवड्यापर्यंतच ६४७३८.६७ घनमीटर आकाराची जलसंधारण कामे करण्यात आली आहेत. अद्याप कामे पूर्णत्वास गेली नसली तरी, या कामांमुळे कोट्यवधी लीटरच्या जलसाठ्याची सोय होणार आहे. 
राज्य शासन आणि भारतीय जैन संघटना (बीजेएस)च्या सामंजस्य करारातून जिल्ह्यात सीसीटी, डीप सीसीटी, साठवण तळे, वनतळे, नाला खोलीकरण आदि जलसंधारणाची शेकडो कामे करण्यात येत आहेत. कृषी विभाग, जलसंधारण विभाग, जि.प. लघू सिंचन विभाग, वनविभागाच्यावतीने ही कामे करण्यात येत आहेत. यातील ४६ साठवण तळ्यांपैकी मंगरुळपीर येथील चांभई आणि पिंपळखुटा, मानोरा तालुक्यातील सोमनाथ नगर, वाशिम तालुक्यातील चिखली आणि मालेगाव तालुक्यातील चिवरा येथील साठवण तळ्यांचे काम वेगात सुरू आहे. वाशिम तालुक्यातील शंभर चौरस मीटर लांबी, रुंदीच्या साठवण तळ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तालुक्यातील कामांचा विचार करता वाशिम तालुक्यात डीप सीसीटी आणि साठवण तळे मिळून  ३१२९२.७२ घनमीटर, कारंजा तालुक्यात सीसीटी, डीप सीसीटी मिळून १६७७५ घनमीटर, मालेगाव तालुक्यात साठवण तळे, नाला खोलीकरण आणि डीप सीसीटी मिळून १५६०० घनममीटर, मानोरा तालुक्यात साठवण तळे आणि डीपसीसीटी मिळून ९९७३, तर मंगरुळपीर तालुक्यात नाला खोलीकरण आणि साठवण तळे मिळून ३३५० घनमीटरची कामे झाली आहेत. 

वाशिम तालुका आघाडीवर 
वाशिम तालुक्यात सुजलाम्, सुफलाम अभियानांतर्गत जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली आहेत. यात कृषी विभागामार्फत चिखली येथे सुरु असलेल्या साठवण तळ्याचे काम गत आठवड्यातच १८१५३ घनमीटर झाले. त्याशिवाय वनविभागाच्या सहकार्याने १३ हजार घनमीटर हून अधिक क्षेत्रात डीप सीसीटीचे काम पूर्ण झाले आहे.

Web Title: 65 thousand cubic meters of work under Sujlam suflam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.