जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६६ टक्के पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:43 AM2021-07-28T04:43:33+5:302021-07-28T04:43:33+5:30
जिल्ह्यात सर्व मिळून जून ते सप्टेंबर अखेर ७८९ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. तर जून ते २७ जुलै दरम्यान ३७८.६ ...
जिल्ह्यात सर्व मिळून जून ते सप्टेंबर अखेर ७८९ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. तर जून ते २७ जुलै दरम्यान ३७८.६ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. प्रत्यक्षात याच कालावधीत जिल्ह्यात ५२१.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण १३७.७ टक्के असून, वार्षिक सरासरीच्या ६६.१ टक्के आहे. स्वतंत्र सरासरीचा विचार करता कारंजा तालुक्यात १ जून ते २७ जुलै दरम्यानच्या कालावधीत ३७४.४ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. प्रत्यक्षात या कालावधीत कारंजा तालुक्यात ३७४.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अर्थात आजवरच्या सरासरीपेक्षा १.२ टक्के अधिक पाऊस कारंजा तालुक्यात पडला आहे. इतर तालुक्यात मात्र आजवरच्या सरासरीपेक्षा खूप अधिक पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत २६ जुलैपर्यंतच ६५.७ टक्के पाऊस पडला आहे.
-------------------
गतवर्षीपेक्षा १० टक्के अधिक पाऊस
जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७८९.०० मि.मी. पाऊस अपेक्षित असतो, तर १ जून ते २७ जुलै दरम्यान ३७८.६ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना यंदा याच कालावधीत ५२१.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात ४८१.७ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. अर्थात जिल्ह्यात यंदा उपरोक्त कालावधीतील अपेक्षित सरासरीपेक्षा १० टक्के अधिक पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात विद्यमान कालावधीत गतवर्षीपेक्षा कमी पाऊस पडला होता.
-------
पावसाची तालुकानिहाय सरासरी (१ ते २७ जुलै, मि.मी.)
तालुका - अपेक्षित पाऊस - प्रत्यक्ष पाऊस
वाशिम - ४२९.७ - ५२२.२
रिसोड - ३७३.८ - ५२९. ७
मालेगाव - ३८४.७ - ५३६.४
मं.पीर - ३३६.५ - ६१७.४
मानोरा - ३४४.३ - ५७४.१
कारंजा -३७४.४ -३७४.९