६,७४४ उमेदवार देणार ‘एमपीएससी’ची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:29 AM2021-09-02T05:29:24+5:302021-09-02T05:29:24+5:30

वाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्वपरीक्षा-२०२० शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१ रोजी ...

6,744 candidates will appear for the MPSC exam | ६,७४४ उमेदवार देणार ‘एमपीएससी’ची परीक्षा

६,७४४ उमेदवार देणार ‘एमपीएससी’ची परीक्षा

Next

वाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्वपरीक्षा-२०२० शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१ रोजी वाशिम शहरातील १५ व मंगरुळपीर शहरातील ६ अशा जिल्ह्यांतील एकूण २१ परीक्षा उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ६,७४४ उमेदवारांची नोंदणी झाली असून, सर्व परीक्षा उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले.

वाशिम शहरातील राजस्थान महाविद्यालय, माउंट कारमेल इंग्लिश स्कूल, श्री शिवाजी विद्यालय, श्री तुळशीराम जाधव कला व विज्ञान महाविद्यालय, सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालय, एस.एम.सी. इंग्लिश स्कूल, हॅपी फेसेस हायस्कूल, श्री.बाकलीवाल विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, रेखाताई राष्ट्रीय कन्या विद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय, श्रीमती मालतीबाई सरनाईक कन्या शाळा, सरस्वती समाजकार्य महाविद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय यासह मंगरुळपीर शहरातील यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, यशवंतराव चव्हाण विद्यालय, कलंदरिया उर्दू हायस्कूल, यशवंतराव चव्हाण इंग्लिश हायस्कूल, सिद्धार्थ विद्यालय या उपकेंद्रांवर ही परीक्षा होत आहे. या सर्व परीक्षा उपकेंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्यामुळे परीक्षा उपकेंद्रांवर ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही. उपकेंद्राच्या १०० मीटर परिक्षेत्रात केंद्राधिकारी, पर्यवेक्षक, समवेक्षक, सहाय्यक कर्मचारी, परीक्षार्थी, परीक्षेसाठी नियुक्त समन्वय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडून नियुक्त केलेले अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेशास मनाई करण्यात आली.

Web Title: 6,744 candidates will appear for the MPSC exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.