६८0 शेततळ्यांची कामे झाली पूर्ण!
By admin | Published: May 8, 2017 01:20 AM2017-05-08T01:20:28+5:302017-05-08T01:20:28+5:30
‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे कृषी विभागाचे प्रयत्न
वाशिम : फेब्रूवारी २0१६ मध्ये शासनस्तरावरून मंजूर झालेली ह्यमागेल त्याला शेततळेह्ण ही योजना तांत्रिक अडचणींमुळे मध्यंतरी थंडावली होती. मात्र, आता या योजनेला चांगलीच गती मिळाली असून ६८0 शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. १९00 पैकी उर्वरित १२२0 शेततळ्यांचे उद्दीष्ट अल्पावधीतच पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने यांनी दिली.
मागेल त्याला शेततळे, या योजनेअंतर्गत जिल्ह्यात शेततळे खोदण्याचे काम सद्या सुरू आहे. जिल्ह्यात या योजनेची एप्रिल २0१६ या महिण्यापासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. याअंतर्गत कृषी विभागाला १९00 शेततळ्यांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. मात्र, प्रारंभीच्या काळात काही तांत्रिक अडचणींमुळे शेतकर्यांना योजनेसंबंधीची पुरेशी माहितीच मिळाली नाही. यासह जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात बराच वेळ निघून गेला. पावसाळ्यामुळे तीन महिने कामेच होवू शकली नाहीत. परिणामी, नोव्हेंबर २0१६ अखेर योजनेंतर्गत ३२ शेततळ्यांची कामे पूर्ण होवू शकली होती. डिसेंबरमध्ये मात्र प्रशासनाने या योजनेला गती देवून ८६ शेततळ्यांची कामे पूर्ण करून घेतली. डिसेंबर २0१६ ते मे २0१७ या कालावधीत योजनेने गती घेवून ६८0 शेततळ्यांची कामे पूर्ण झाली. उर्वरित १२२0 शेततळ्यांची कामेही येत्या काही महिण्यांत पूर्णत्वास जातील, असे गावसाने यांनी सांगितले.
मागेल त्याला शेततळे या योजनेत जिल्ह्याला १९00 शेततळ्यांचे उद्दीष्ट मिळाले असून त्याच्या पुर्ततेसाठी कृषी विभागाकडून सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, स्थळ निरीक्षण यासह इतरही किचकट बाबींवर मात करून कर्मचारी शेततळ्यांची कामे पूर्ण करित आहेत.
- दत्तात्रेय गावसाने
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी