७ गावात टँंकरव्दारे पाणीपुरवठा

By admin | Published: June 7, 2014 10:23 PM2014-06-07T22:23:44+5:302014-06-07T22:54:13+5:30

मुबलक प्रमाणात पाउस पडल्यामुळे सौम्य स्वरुपाची पाणीटंचाई जाणवत आहे.

7 Water supply through tanker | ७ गावात टँंकरव्दारे पाणीपुरवठा

७ गावात टँंकरव्दारे पाणीपुरवठा

Next

वाशिम : जिल्हयात मागीलवर्षीच्या पावसाळयात मुबलक प्रमाणात पाउस पडल्यामुळे सौम्य स्वरुपाची पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे जिल्हयात केवळ आठ गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत असून त्यापैकी सात गावांना सात टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मागील वर्षी पावसाळयात अगदी जून महिन्यापासून ते सप्टेंबर अखेपर्यंत मुबलक प्रमाणात पाउस पडला जिल्हयात पावसाळयात दरवर्षी सरासरी ७९८ मिलीमीटर पाउस पडतो. परंतु मागीलवर्षी पावसाळयात जिल्हयाच्या सरासरीच्या दिडपटीवून अधिक १२४ मि.मी. पाउस पडल्यामुळे नोंद झालेली आहे. गतवर्षी जुन, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात अनेकवेळा अतवृष्टी झाली सप्टेंबर महिन्यातही चांगला पाउस झाला पावसाळयाच्या या चार महिन्यानंतर अँक्टोबर २0१३ व फेब्रुवारी, मार्च, एप्रिल २0१४ या महिन्यांमध्येही अवकाळी स्वरुपाचा पाउस पडला त्यामुळे जिल्हयातील १0१ पैकी ८५ सिंचन प्रकल्प १00 टक्के तर उर्वरित सर्व ५0 टक्केपेक्षा जास्त भरले होते जि.प.सिंचन प्रकल्प, व अन्य जलाशये तुडूंब भरली होती. गावोगावी मे महिन्यातही विहीरींना भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध होते. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळयात पाणीमागणी साठी तहसिल कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणे मोर्चे, आंदोलने झाली नाहीत. यंदा जिल्हयात सद्य:स्थितीत मानोरा तालुक्यातील हिवराखुर्द, पाळोदी, उज्वलनगर, वाशिम तालुक्यातील माळेगाव फाटा, भटउमरा सोनगव्हाण,बोरी खदरु, मालेगाव, तालुक्यातील वरदरी बु व कारंजा तालुक्यातील कार्ली या आठ गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे या आठही गावांमध्ये खासगी विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यापैकी वाशिम तालुक्यातील माळेगावफाटा, सोनगव्हाण, बोरी खुर्द, मानोरा तालुक्यातील हिवरा हिवरा, पाळोदी , उज्वलनगर, व मालेगाव तालुक्यातील वरदरी बु. या सात गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 7 Water supply through tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.