७0 वर्षांंतील प्रलंबित कामे तीन वर्षांंत लागली मार्गी!

By admin | Published: July 9, 2017 09:50 AM2017-07-09T09:50:35+5:302017-07-09T09:50:35+5:30

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री भामरे यांचे प्रतिपादन; वाशिममध्ये झाले ‘सबका साथ सबका विकास’ संमेलन.

70 years of delayed work was done for three years! | ७0 वर्षांंतील प्रलंबित कामे तीन वर्षांंत लागली मार्गी!

७0 वर्षांंतील प्रलंबित कामे तीन वर्षांंत लागली मार्गी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : तत्कालिन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ वगळता काँग्रेसने ७0 वर्षे सत्ता सांभाळली. या दरम्यानच्या काळात टू जी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा यांसह इतरही मोठे घोटाळे झाले. सिंचनावर ६0 हजार कोटी रुपये खर्चूनही १ टक्कादेखील सिंचन वाढले नाही. रेल्वे, रस्त्यांच्या बाबतीतही अनेक कामे प्रलंबित होती. ती भाजपाने गेल्या तीन वर्षांंत मार्गी लावली आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी येथे ८ जुलै रोजी केले.
स्थानिक पाटणी कमश्रीयल कॉम्प्लेक्समध्ये आयोजित ह्यसबका साथ सबका विकासह्ण संमेलनात ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील होते. आमदार राजेंद्र पाटणी, हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, उपाध्यक्ष रुपेश वाघमारे, शिवराज कुलकर्णी, नरेंद्र गोलेच्छा, राजू पाटील राजे, धनंजय रणखांब, श्याम बडे, तेजराव वानखडे, वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडचे महाप्रबंधक आर. के. सिंह, क्षेत्रीय कार्मिक प्रबंधक प्रभाकर देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. डॉ. भामरे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षात शेतकरी, वंचित, गरीब जनतेला केंद्रस् थानी ठेवून विविध योजना आखल्या व त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. शेतीच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. याकरिता देशातील अपूर्ण सिंचन प्रकल्प २0१९ पयर्ंत पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना राबविली जात आहे. नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना भरपाई देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे, तसेच शे तकर्‍यांना त्यांच्या जमिनीची मृद आरोग्य पत्रिका देण्याचा निर्णय घेण्या त आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भ्रष्टाचार कमी होऊन सरकारची ५0 हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. कोळसा खाण, स्पेक्ट्रम लिलावांमध्येही पारदर्शकता आणल्याने केंद्र शासनाला कोट्यवधी रु पयांचा निधी उभारता आला. या निधीतून देशभरात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध झाला आहे. पारदर्शक कारभारामुळे गेल्या तीन वर्षात विकास कामांचा वेग वाढविण्यात सरकारला यश आल्याचे ना. डॉ. भामरे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील उज्‍जवला योजनेच्या महिला लाभार्थ्यांना घरगुती गॅस जोडणी पत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.के.सिंह यांनी केले.
शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न - गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील
केंद्र व राज्यशासनाने शेती व शेतकर्‍यांच्या विकासाच्या योजना राबविण्यास प्राध्यान्य दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३४ हजार कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी करण्याचा धाडसी निर्णय घे तला आहे. भविष्यात शेतकरी कर्जबाजारी होऊ नये, यासाठी मु ख्यमंत्र्यांचे प्रयत्न सुरु आहेत. शेतकर्‍यांना महात्मा फुले आरोग्यदायी योजनेचा लाभ देणे व अन्नसुरक्षा योजनेच्या दरात धान्य देण्यासारखे महत्त्वपूर्ण निर्णयही राज्य शासनाने घेतले आहेत. तसेच ग्रामीण भागा तील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर ११ बॅरेजेसची उभारणी करून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या परिसरातील शेतकर्‍यांना वीज जोडणी देण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. समाजातील गरीब, वंचित व दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही ना. डॉ. पाटील यावेळी म्हणाले.
आमदार पाटणी म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षात वाशिम जिल्ह्यात अनेक विकासकामे सुरु झाली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे ६ हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले, तसेच रेल्वे विभागाच्या माध्यमातून सुरु झालेल्या वर्धा ते नांदेड आणि अचल पूर ते यवतमाळ रेल्वे मार्गाच्या कामांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे. नागपूर-मुंबई समृद्धी मार्गाचा सुमारे ११0 किलोमीटर ट प्पा वाशिम जिल्ह्यातून जात असून, त्याचाही भविष्यात जिल्हय़ाला फायदा होईल. स्वच्छ भारत अभियानमध्ये कारंजा तालुका हगणदरीमुक्त झाला असून, अमरावती विभागातील हगणदरीमुक्त होणारा तो पहिलाच तालुका असल्याचे आमदार पाटणी म्हणाले.

Web Title: 70 years of delayed work was done for three years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.