रिसोड तालुक्यात ३३४ जागेसाठी ७०७ उमेदवारांमध्ये लढत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:09 AM2021-01-08T06:09:34+5:302021-01-08T06:09:34+5:30

राजकीय क्षेत्रात नेहमीच चर्चेत राहणाऱ्या रिसोड तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ हा ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या काळात ...

707 candidates contesting for 334 seats in Risod taluka! | रिसोड तालुक्यात ३३४ जागेसाठी ७०७ उमेदवारांमध्ये लढत !

रिसोड तालुक्यात ३३४ जागेसाठी ७०७ उमेदवारांमध्ये लढत !

Next

राजकीय क्षेत्रात नेहमीच चर्चेत राहणाऱ्या रिसोड तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ हा ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या काळात संपला आहे. कोरोनामुळे सप्टेंबर महिन्यात या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. डिसेंबर महिन्यात निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच, तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला. ४ जानेवारी रोजी तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींमधील निवडणूक लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले, तर मोप येथे नऊ जागेसाठी नऊच उमेदवारी अर्ज राहिल्याने अविरोध निवड झाली आहे. मात्र विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही महाविकास आघाडीने एकत्र लढविली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत ही स्थानिक पातळीवर आघाडी, पॅनलच्या माध्यमातून लढविली जात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ३३ ग्रामपंचायतींमध्ये राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग घेतल्याचे दिसून येते.

०००००

अशी आहे ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार संख्या

रिसोड तालुक्यातील नावली येथे १९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याप्रमाणे नंधाना येथे १८ उमेदवार, गोभणी २९, मांगूळझनक १९, नेतन्सा २२, कवठा खुर्द ३३, चिखली २२, चिंचाबापेन १८, गोवर्धन २७, केशवनगर १४, शेलु खडसे २५, लोणी बु. २६, चिंचाबाभर २३, मसलापेन १८, कंकरवाडी ११, सवड २२, करडा १८, केनवड २४, बिबखेड १३, पळसखेड २१, आगरवाडी २०, वाकद ३०, मोठेगाव २८, गौंढाळा २०, एकलासपूर १६, खडकी सदार १४, येवती १२, रिठद २५, व्याड २२, करंजी १३, वनोजा २४, देऊळगाव बंडा २१ तर हराळ ग्रामपंचायतमध्ये ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

Web Title: 707 candidates contesting for 334 seats in Risod taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.