निवडणुकीच्या कामासाठी ७१ कर्मचारी

By admin | Published: September 15, 2014 01:54 AM2014-09-15T01:54:18+5:302014-09-15T01:54:18+5:30

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या कक्षांमध्ये ७१ कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली आहे.

71 employees for election work | निवडणुकीच्या कामासाठी ७१ कर्मचारी

निवडणुकीच्या कामासाठी ७१ कर्मचारी

Next

अकोला : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या कक्षांमध्ये ७१ कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. १0 कक्षांमध्ये या कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ११ कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ११ नोडल अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. अधिकारी-कर्मचार्‍यांची माहिती संकलित करणे, मतदान पथके तयार करणे, मतदान पथकांना प्रशिक्षण, मतमोजणी अधिकारी-कर्मचार्‍यांची नेमणूक करणे व त्यांना प्रशिक्षण देणे, नामनिर्देशनपत्र व त्यासोबतच्या कागदपत्रांची माहिती प्राप्त करणे, मतदान यंत्रांची वाहतूक, तपासणी, सरमिसळ व वितरण करणे, अशा निवडणूकविषयक कामांसाठी नेमणूक करण्यात आली आहे.

Web Title: 71 employees for election work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.