वाहनातून ७१ लाखांची बेहिशेबी रक्कम जप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 01:15 PM2018-12-23T13:15:36+5:302018-12-23T13:15:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : वाशिमवरून रिसोडकडे जाणाºया स्विप्ट डिझायर या चारचाकी वाहनातून ७१ लाख ८०० रुपयांची बेहिशेबी रक्कम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिमवरून रिसोडकडे जाणाºया स्विप्ट डिझायर या चारचाकी वाहनातून ७१ लाख ८०० रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त करण्यात आली. रिसोड पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २२ डिसेंबर रोजी केलेल्या या संयुक्त कारवाईत दोघांना जेरबंद करण्यात आले आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, वाशिमवरून रिसोडकडे जाणाºया स्विप्ट डिझायर या वाहनातून बेहिशेबी रक्कम नेली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहनाचा वाशिममवरून पाठलाग सुरू केला. यादरम्यान पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांनी रिसोडचे ठाणेदार राजेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधून नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या. यादरम्यान वाहन थांबवून पोलिसांनी चौकशी केली असता, सुरेश भिमराव कसबे आणि बाबासाहेब प्रल्हाद वळसकर (दोघेही रा. जालना) यांनी सदर कॅश व्यापाºयाची असून त्यासंबंधाने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच कॅशबाबत कोणतेही कागदपत्र त्यांच्याकडे आढळून आले नाही. त्यामुळे पोलिसांनी ७१ लाख ८०० रुपये रोख व ३ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ७४ लाख ८०० चा मुद्देमाल जप्त केला. संबंधित दोन्ही इसमांना कॅशसंबंधी लेखी पुरावे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून कर विभागाशीही संपर्क साधण्यात आला आहे.