ई-सेवा केंद्रांतील डिजिटल स्वाक्षरीचा ७/१२ ग्राहय़!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 01:46 AM2017-10-18T01:46:34+5:302017-10-18T01:47:08+5:30

वाशिम तालुक्यात ७/१२ संगणकीकरणाचे काम पूर्ण  झाले आहे. त्यामुळे कोणत्याही शासकीय, निमशासकीय  कामासाठी महाभूलेख या पोर्टलवरी सातबारा वापरता येणार  नसून, त्याऐवजी महा ई सेवा केंद्रांमधून आपले सरकार या  पोर्टलद्वारे उपलब्ध करण्यात येणारा डिजिटल स्वाक्षरीचा किंवा  बारकोडचा ७/१२ स्विकारण्यात येणार आहे.

7/12 credentials of digital signage in e-service center! | ई-सेवा केंद्रांतील डिजिटल स्वाक्षरीचा ७/१२ ग्राहय़!

ई-सेवा केंद्रांतील डिजिटल स्वाक्षरीचा ७/१२ ग्राहय़!

Next
ठळक मुद्देवाशिम तहसीलदारांचे निर्देशमहाभुलेख पोर्टलवरील ७/१२ रद्दबातल

शिखरचंद बागरेचा । 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: वाशिम तालुक्यात ७/१२ संगणकीकरणाचे काम पूर्ण  झाले आहे. त्यामुळे कोणत्याही शासकीय, निमशासकीय  कामासाठी महाभूलेख या पोर्टलवरी सातबारा वापरता येणार  नसून, त्याऐवजी महा ई सेवा केंद्रांमधून आपले सरकार या  पोर्टलद्वारे उपलब्ध करण्यात येणारा डिजिटल स्वाक्षरीचा किंवा  बारकोडचा ७/१२ स्विकारण्यात येणार आहे. वाशिमच्या  तहसीलदारांनी या संदर्भात सर्व तलाठय़ांना निर्देश दिले असून,  महा ई सेवा केंद्रधारकांनाही आपले सरकार पोर्टलवरील ७/१२  निर्गमित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वाशिम तालुक्यात ७/१२ संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले  असून, आता तालुक्यात डिजिटल स्वाक्षरी किंवा बारकोड व  अँप्लिकेशन आयडीसह ७/१२ उपलब्ध होत आहे. त्यामुळे या पुढे तलाठी व महा ई सेवा केंद्रधारकाची डिजिटल ७/१२ वर  स्वाक्षरीची व शिक्क्याची आवश्यकता नाही. त्यामुळे कोणत्याही  शासकीय कामासाठी किंवा कायदेशीर बाबीसाठी महाभूलेख या  पोर्टलवरून निघणारा ७/१२ स्विकारला जाणार नाही किंवा वा परता येणार नाही. या संदर्भात वाशिमचे जिल्हाधिकारी, तसेच  जिल्हा समन्वयकांनी वाशिमच्या तहसीलदारांना पत्र पाठवून  केवळ महा ई सेवा केंद्रामधून मिळणारा डिजिटल स्वाक्षरीचा  किंवा बारकोड असलेला ७/१२ स्विकारण्याबाबत सर्व संबंधि तांना सूचित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याची  अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदारांनी संबंधितांना पत्राद्वारे  सुचित केले आहे.
 यापुढे शेतकर्‍यांना महा ई सेवा केंद्रांमधून मिळणारा डिजिटल  स्वाक्षरीचा किंवा बारकोड असलेला ७/१२ कोणत्याही  शासकीय कामांसाठी वापरावा लागणार असून, या संदर्भात महा  ई सेवा केंद्रांसह तलाठय़ांकडून अधिक मार्गदर्शन करण्यात  येणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची गैरसोय टळणार आहे. 

Web Title: 7/12 credentials of digital signage in e-service center!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.