धनज आरोग्य केंद्रांतर्गत ७२७० व्यक्तींनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:27 AM2021-06-29T04:27:29+5:302021-06-29T04:27:29+5:30

धनज बु. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३३ गावांचा समावेश होतो. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत परिसरात कोरोना रुग्णांचे प्रमाण लक्षणीय वाढले ...

7270 persons were vaccinated under Dhanaj Health Center | धनज आरोग्य केंद्रांतर्गत ७२७० व्यक्तींनी घेतली लस

धनज आरोग्य केंद्रांतर्गत ७२७० व्यक्तींनी घेतली लस

Next

धनज बु. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३३ गावांचा समावेश होतो. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत परिसरात कोरोना रुग्णांचे प्रमाण लक्षणीय वाढले होते. त्यामुळे आरोग्य विभागाने कोरोना चाचणीसह लसीकरणावर भर दिला होता. यासाठी धनज बु. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून गावोगावी कोरोना लसीकरणाविषयी जागृती करून शिबिर घेण्यात आले. या शिबिरांना नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. आतापर्यंत ७२२० नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. यामध्ये ७२२० पैकी कोविशिल्डचा पहिला डोस ५२३३ नागरिकांनी घेतला आहे. तर२०३७ नागरिकांनी कोव्हॅक्सिन ही लस घेतली आहे. तसेच ९० दिवसांच्या कालावधीनंतर दिला जात असलेला दुसरा डोस हा ३१५४ नागरिकांनी घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना लसीविषयी असलेली भीती आहे. कमी झाल्याचे दिसून येत आहे. धनज प्राथमिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टर, आरोग्यसेवक व सेविका आशासेविका यांनी या कोरोना लसीकरण मोहिमेविषयी जनजागृती करून गावात लसीकरण कॅम्प घेतले आहे. त्यामुळे वेगवान लसीकरण होण्यास मदत होत आहे.

-------------------

प्रत्येक नागरिकाला लसीकरणाचा लाभ देणार

कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन व्यापक उपाययोजना करीत आहे. त्यात धनज बु. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात लसीकरणाला वेग दिला आहे. यासाठी गावागावात शिबिरांचे आयोजन केले जात असून, प्रत्येक नागरिकाला लसीकरणाचा लाभ देऊन कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न करणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: 7270 persons were vaccinated under Dhanaj Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.