वाशिमच्या शेतकऱ्यांना शेततळे अस्तरीकरणसाठी मिळणार ७५ हजाराचे अनुदान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 01:58 PM2017-11-08T13:58:31+5:302017-11-08T14:00:10+5:30
शेतकºयांनी स्वखर्चाने खोदकाम केलेल्या किंवा इतर योजनांतर्गत खोदण्यात आलेल्या शेततळ्यांसाठी प्लास्टिक फिल्म अस्तरीकारांसाठी कृषी विभागामार्फत सन २०१७-१८ या वर्षात खर्चाच्या ५० टक्के किंवा ७५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
वाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, मागेल त्याला शेततळे, भरडधान्य अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कोरडवाहू शेती अभियान, राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान तसेच शेतकºयांनी स्वखर्चाने खोदकाम केलेल्या किंवा इतर योजनांतर्गत खोदण्यात आलेल्या शेततळ्यांसाठी प्लास्टिक फिल्म अस्तरीकारांसाठी कृषी विभागामार्फत सन २०१७-१८ या वर्षात खर्चाच्या ५० टक्के किंवा ७५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकºयांनी आपले अर्ज १६ नोव्हेंबर २०१७ अखेर शासनाच्या संकेतस्थळावरून आॅनलाईन पध्दतीने स्वतंत्रपणे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. एस. गावसाने यांनी केले.
शेततळ्यासाठी वापरायची फिल्म ही शासनाच्या निकषानुसार असणे आवश्यक आहे. शेततळे अस्तरीकरणासाठी वाशिम जिल्ह्याकरिता १२० भौतिक व ९० लाख रुपये आर्थिक उद्दिष्ट मिळाले आहे. त्यानुसार सर्व तालुक्यांना २० भौतिक व १५ लाख रुपये आर्थिक उद्दिष्ट देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांनी आॅनलाईन स्वरुपात अर्ज सादर करावेत. तालुक्यांना देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त शेतकºयांचे अर्ज प्राप्त झाल्यास २० नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात लॉटरी पध्दतीने लाभार्थी निवड करण्यात येईल. अधिक माहितीसाठी शेतकºयांनी संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन गावसाने यांनी केले.