७५ हजारांचे सागवानी फर्निचर जप्त
By Admin | Published: January 12, 2015 01:47 AM2015-01-12T01:47:55+5:302015-01-12T01:47:55+5:30
रिसोड येथे वनविभागाची कारवाई.
रिसोड : वन विभागाच्या गस्ती पथकाने रिसोड ते लोणार रोडवर ११ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता वाहन क्र. ४४ एमएच २0 सी टी ५२४९ या वाहनामध्ये औरंगाबाद ते रिसोड वाहनातून होत असलेल्या सागवान मालापासून तयार केलेले फर्निचर वाहनासह जप्त केले. वनाधिकारी मोहन भोसले क्षेत्र सहाय्यक रिसोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वाहनामध्ये सागवानापासून तयार केलेले सोफासेट ४ नग, लाकडी पलंग ४ नग असे एकूण ८ नग जप्त केले. यातील आरोपी शेख असलम शेख मेहतरम रा. इंदिरानगर औरंगाबाद याच्याकडून सागवान फर्निचर तसेच वाहन एकूण किंमत १ लाख ७५ हजार रुपयांची मालमत्ता जप्त करून भादंवि अधिनियम १९२७ ची कलम ५२ व ४१ अन्वये, प्रा. गु.रि. क्र. ७0६/२ अन्वये वन गुन्हा करण्यात आला. याचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी बी.के. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकारी मोहन भोसले तसेच वनरक्षक हनुमान विठोबा साठे, विष्णू अश्रुजी जटाळे करताहेत.