वाशिम जिल्ह्यातील ७५,४२६ शेतकऱ्यांनी उतरविला पीक विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 11:35 AM2021-07-15T11:35:28+5:302021-07-15T11:35:36+5:30
75,426 farmers take out crop insurance : १४ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ७५४२६ शेतकºयांनी पीक विमा उतरविला आहे.
- सुनील काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पिकांचे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगराईमुळे नुकसान झाल्यास पिकांना संरक्षण म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत १४ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ७५४२६ शेतकºयांनी पीक विमा उतरविला आहे. १५ जुलै अंतिम मुदत असून, मुदतवाढ मिळेल की नाही? याकडे शेतकऱ्यांचेलक्ष लागून आहे.
नैसर्गिक आपत्ती, किडीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते. नुकसानभरपाई मिळावी याकरीता प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पिकांना संरक्षण देण्यात येते. मात्र, जाचक अटी असल्याचे कारण समोर करून अनेक शेतकरी पीक विमा योजनेकडे पाठ फिरवित असल्याचे दिसून येत आहे. या योजनेत शेतकऱ्यांचा अधिकाधिक सहभाग लाभावा याकरीता जनजागृती करण्यात आली. अनेक ठिकाणी बँक, सामूहिक सुविधा केंद्र, कृषी केंद्र तसेच ग्रामपंचायतच्या दर्शनी भागात या योजनेचे पोस्टरही लावण्यात आले. तथापि, शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला नसल्याचे दिसून येते. १४ जुलैपर्यंत ४१७६ कर्जदार आणि ७१२५० बिगर कर्जदार अशा एकूण ७५४२६ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. विमा उतरविण्यासाठी १५ जुलै अंतिम मुदत असून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत १५ जुलैंपर्यंत शेतकºयांना पीक विमा उतरविता येणार आहे. १४ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ७५ हजार ४२६ शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. या योजनेत अधिकाधिक शेतकºयांनी सहभागी व्हावे.
- शंकर तोटावार
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी