७६५२ शेतकऱ्यांनी केला ३.४२ कोटींच्या वीज देयकाचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:29 PM2021-04-08T16:29:43+5:302021-04-08T16:30:28+5:30

Electricity bill : ३ कोटी ४२ लाख रूपये थकित बिलाचा भरणा केल्याने त्यांची वाटचाल थकबाकीमुक्तीकडे झाली आहे. 

7652 farmers paid electricity bill of Rs 3.42 crore | ७६५२ शेतकऱ्यांनी केला ३.४२ कोटींच्या वीज देयकाचा भरणा

७६५२ शेतकऱ्यांनी केला ३.४२ कोटींच्या वीज देयकाचा भरणा

Next

वाशिम : महा कृषी ऊर्जा अभियान २०२० च्या माध्यमातून महावितरणच्या अकोला परिमंडला अंतर्गत असलेल्या वाशिम जिल्हयातील ७ हजार ६५२ कृषी ग्राहकांनी ३ कोटी ४२ लाख रूपये थकित बिलाचा भरणा केल्याने त्यांची वाटचाल थकबाकीमुक्तीकडे झाली आहे. 
जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांना महावितरण कृषी वीज जोडणी धोरण - २०२० नुसार वीजबिल कोरे करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या ग्राहकांकडे कृषीपंपाची कोट्यवधी  रुपयांची थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराची रक्कम  माफ करण्यात आली आहे.  मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे. सोबतच त्यांचे थकित वीजबिलही कोरे होणार असल्याने, वीजबिल थकबाकीमुक्तीच्या या अभियानात सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे. 
कृषिपंपाच्या नवीन वीज जोडण्या तसेच वीजबिलांच्या वसुलीसाठी थकबाकी, व्याज व विलंब आकारात भरघोस सवलत देणारे महा कृषी ऊर्जा अभियान ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून जाहीर झाले आहे. या धोरणानुसार जिल्ह्यातील जिल्ह्यातील ७६५२ ग्राहकांनी ३ कोटी ४२ लक्ष  रूपये थकबाकीचा भरणा करत थकबाकी मुक्त झाले आहेत. 
महा कृषी ऊर्जा अभियानात सर्व उच्च व लघुदाब कृषिपंप ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. या ग्राहकांच्या ५ वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात आला आहे. तसेच ५ वर्षांपर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार १०० टक्के माफ करून व्याज हे १८ टक्क्यांऐवजी त्या-त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याजदरानुसार आकारण्यात येत आहे. 
ज्या ग्राहकांनी या अभियानात एक ते तीन वर्षांसाठी सहभाग घेतला त्यांनी त्या-त्या वर्षी भरलेल्या मूळ थकबाकीच्या रकमेपैकी पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के आणि तिसऱ्या वर्षी २० टक्के माफ करण्यात येईल. तसेच मूळ थकबाकीचा भरणा करताना चालू वीजबिलांची रक्कम भरणेही गरजेचे आहे.  शेतकऱ्यांना वीजबिल थकबाकीमुक्तीची संधी तसेच वसूल झालेल्या बिलातील ३३ टक्के रक्कम ही संबंधित ग्रामपंचायत व ३३ टक्के रक्कम ही जिल्ह्यातील विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी वापरली जाणार असल्याने महावितरणतर्फे जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांशी थेट संवाद साधून अभियानाची माहिती दिली जात आहे. तसेच वीजबिलांबाबत शंका किंवा तक्रारी असल्यास त्या तात्काळ दूर करण्याच्या सूचना महावितरणच्या अकोला परिमंडळाने क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या आहेत. 

Web Title: 7652 farmers paid electricity bill of Rs 3.42 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.