पीकविम्याचे ८ कोटी रुपये मंजूर

By admin | Published: July 5, 2014 11:25 PM2014-07-05T23:25:05+5:302014-07-05T23:50:19+5:30

५१४९0 शेतकर्‍यांना मिळणार लाभ, बँकेत रक्कम जमा होणार

8 crore of pakimaem approved | पीकविम्याचे ८ कोटी रुपये मंजूर

पीकविम्याचे ८ कोटी रुपये मंजूर

Next

वाशिम : जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी सन २0१३-१४ च्या खरीप पीक हंगामात काढलेल्या पीकविम्यापोटी तब्बल ८ कोटी ९६ लाख १६ हजार १४३ रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. सदर रक्कम शेतकर्‍यांनी ज्या बँकेच्या शाखेत पीकविम्याचा प्रिमिअम जमा केला. त्याच बँकेत जमा केली जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी दिली.
सन २0१३-१४ मध्ये खरीप हंगामात जिल्हय़ातील १ लाख ५९ हजार ६८९ शेतकर्‍यांनी पीकविमा काढला होता. त्यापोटी शेतकर्‍यांनी ७ कोटी ६१ लाख १६ हजार ३४८ रुपयांची रक्कम प्रिमिअमपोटी भरली होती. त्यापैकी ५१,४९0 शेतकर्‍यांना या पीकविम्याचा लाभ मिळणार असून त्यापोटी विमाकंपनीने ८ कोटी ९६ लाख १६ हजार १४३ रुपयांची रक्कम मंजूर केली आहे. सदर रक्कम शेतकर्‍याने विमा प्रिमिअम भरलेल्या बँकेतच शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी विमा प्रिमिअम भरलेल्या बँकेत चौकशी करावी असेही चव्हाण यांनी सांगितले.सन २0१३-१३ मध्ये जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी ७ कोटी ६१ लाख १६ हजार ३४८ रुपयांच्या भरलेल्या प्रिमिअमपोटी तब्बल ८ कोटी ९६ लाख १६ हजार १४३ रुपयांची रक्कम मंजूर झाल्याने विमा कंपनी एका अर्थाने तोट्यात गेली असली तरी शेतकर्‍यांचा मात्र फायदा झाला आहे.

Web Title: 8 crore of pakimaem approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.