वाशिम जिल्ह्यात आणखी ८ कोरोनामुक्त; ४ पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 05:53 PM2021-07-21T17:53:54+5:302021-07-21T17:54:02+5:30
Corona Cases in Washim : ४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर ८ जणांनी कोरोनावर मात केली.
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून बुधवार, २१ जुलै रोजी ४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर ८ जणांनी कोरोनावर मात केली. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१,६२० वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. बुधवारी नव्याने ४ रुग्ण आढळून आले तर ८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मंगरूळपीर व कारंजा तालु्क्याचा अपवाद वगळता उर्वरीत चार तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१६२४ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०९४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंंत ६२२ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
चार तालुके निरंक
बुधवारच्या अहवालानुसार वाशिम, रिसोड, मालेगाव व मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. कारंजा शहरातही रुग्ण आढळला नाही. वाशिम शहरात सलग चवथ्या दिवशीही रुग्ण आढळून आला नसल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला.
५७ सक्रिय रुग्ण
बुधवारच्या अहवालानुसार नव्याने ४ रुग्ण आढळून आले तर ८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ५७ रुग्ण सक्रिय आहेत.