पोहरादेवीकडे जाणारे ८ मार्ग २३ मार्च ते ५ एप्रिलपर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 05:48 PM2020-03-14T17:48:42+5:302020-03-14T17:48:49+5:30
पोहरादेवीकडे जाणारे मार्ग २३ मार्च ते ५ एप्रिलदरम्यान बंद करण्याचा आदेश १४ मार्च रोजी काढला आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया पोहरादेवी येथे रामनवमीनिमित्त दरवर्षी होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. तथापि, राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल होण्याची शक्यता असून, याद्वारे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. या पृष्ठभुमीवर जिल्हाधिकाºयांनी पोहरादेवीकडे जाणारे मार्ग २३ मार्च ते ५ एप्रिलदरम्यान बंद करण्याचा आदेश १४ मार्च रोजी काढला आहे.
वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात असलेले पोहरादेवी संस्थान बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाते. या ठिकाणी दरवर्षी रामनवमीनिमित्त यात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. या यात्रोत्सवात महाराष्ट्रातील यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलडाणा, हिंगोली, परभणी, नांदेड आदि जिल्ह्यांतील भाविकांसह आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान आदि राज्यांतूनही दोन ते अडीच लाख बंजारा भाविक आपापल्या वाहनाने पोहरादेवी येथे येतात. यात्रोत्सवादरम्यान पोहरादेवीसह नजिकच्याच उमरी खु. येथेही भाविक लो खासगी व ईतर वाहनांनी येतात. ही यात्रा रद्द करण्यात आली असली तरी, बाहेरून येणारी वाहने संत सेवालाल महाराज संस्थान पोहरादेवी येथे आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीची उपाय योजना म्हणून संत सेवालाल महाराज संस्थान पोहरादेवी येथे जाणाºया यात्रेकरूंना थांबविण्यासाठी ८ मार्ग बंद करणे आवश्यक आहे. या पृष्ठभुमीवर जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक यांनी वाशिम मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ (१) अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून पोहरादेवी येथे यात्रेनिमित्त जाणाºया वाहनांच्शा वाहतुकीचे ८ मार्ग २३ मार्च रोजी सकाळी ९ वाजतापासून ते ५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
बंद करण्यात आलेले मार्ग
१) यवतमाळ-दिग्रस-वाईगौळ-पोहरादेवी मार्ग
२) पुसद-सिंगद-पोहरादेवी मार्ग
३) पुसद-ज्योतीबानगर-सेंदोना-पोहरादेवी मार्ग
४) वाशिम-धानोरा-शेंदुरजना-फुलउमरी-पोहरादेवी मार्ग
५) मंगरुळपीर-मानोरा-गव्हा-रतनवाडी-पोहरादेवी मार्ग
६) कारंजा-मानोरा-पंचाळा फाटा-पोहरादेवी मार्ग
७) गवली-फुलउमरी-पोहरादेवी मार्ग
८) दारव्हा-बोरव्हा-कुपटा-पोहरादेवी मार्ग