वाशिम जिल्ह्यातील ८० दुकाने केली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 11:13 AM2021-03-27T11:13:21+5:302021-03-27T11:13:28+5:30

80 shops closed in Washim district आस्थापनांची तपासणी सुरू झाली असून आज मालेगाव, कारंजा, शेलूबाजार - ८० दुकाने बंद करण्यात आली आहेत. 

80 shops closed in Washim district | वाशिम जिल्ह्यातील ८० दुकाने केली बंद

वाशिम जिल्ह्यातील ८० दुकाने केली बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील सर्व आस्थापनाधारकांनी २५ मार्चपर्यंत कोरोना चाचणी करून घ्यावी, कोरोना चाचणी न केलेल्या आस्थापनाधारकांच्या आस्थापना २६ मार्चपासून बंद करण्यात येतील, असे आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केले होते. त्यानुसार, आजपासून कोरोना चाचणी न केलेल्या आस्थापनाधारकांची दुकाने, आस्थापना बंद करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. शहरी व ग्रामीण भागात आस्थापनांची तपासणी सुरू झाली असून आज मालेगाव, कारंजा, शेलूबाजार - ८० दुकाने बंद करण्यात आली आहेत. 
कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनाधारक, व्यावसायिक यांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार २१ मार्चपर्यंत सर्व आस्थापनाधारकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिली होते. कोरोना चाचणी न केल्यास संबंधित आस्थापना बंद करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर ही मुदत २५ मार्चपर्यंत वाढविण्यात आली. त्यानुसार आता जिल्ह्यातील कोरोना चाचणी न केलेल्या आस्थापनाधारकांची दुकाने, आस्थापना बंद करण्याची कारवाई प्रशासनाने सुरु केली आहे. आज मालेगाव शहरातील ३२, कारंजा शहरातील ९, मंगरूळपीर शहरातील ३८ व शेलूबाजार - १ आस्थापना बंद करण्यात आली.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील आस्थापना, दुकानांच्या तपासणीसाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत. शुक्रवारपासून ही पथके जिल्हाभरातील आस्थापनांची तपासणी करुन कोरोना चाचणीचे प्रमाणपत्रांची पाहणी करणार आहेत. 

Web Title: 80 shops closed in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.