८० हजाराची बँग पळविली!

By admin | Published: June 1, 2017 01:13 AM2017-06-01T01:13:35+5:302017-06-01T01:13:35+5:30

मानोरा : शिवाजी चौकात भिमराव देवदत्त पुरी यांच्या हातातील ८० हजार रुपयांची पिशवी अज्ञात मोटारसायकलस्वाराने पळविल्याची घटना ३१ मे रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडली.

80 thousand banks ran away! | ८० हजाराची बँग पळविली!

८० हजाराची बँग पळविली!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : शहरातील शिवाजी चौकात असलेल्या जयलक्ष्मी किराणा दुकानदार भिमराव देवदत्त पुरी यांच्या हातातील ८० हजार रुपयांची पिशवी अज्ञात मोटारसायकलस्वाराने पळविल्याची घटना ३१ मे रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडली.
पुरी हे आपले दुकान बंद करुन जात असतांना अचानक भरधाव वेगाने दुचाकीस्वार आला व त्यांच्या हातात असलेली ८० हजार रुपयांची पिशवी पळविली. पुरी यांनी हातातील बँग न सोडल्याने ते वाहनाला अडकून फरफटत गेल्याने ते जखमी झालेत. पुरी यांनी आरडाओरड केल्याने लोक जमले व मोटारसायकलस्वाराचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु गव्हा रस्त्याने त्यास पळून जाण्यात यश आले. उशिरा रात्रीपर्यंत सदर प्रकरणाची तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Web Title: 80 thousand banks ran away!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.