वैयक्तिक शौचालयाचे ८00 प्रस्ताव धूळ खात
By Admin | Published: July 13, 2015 02:09 AM2015-07-13T02:09:30+5:302015-07-13T02:09:30+5:30
वाशिम पंचायत समितीचे दुर्लक्ष.
देपूळ (जि. वाशिम) : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालयाचे ८00 प्रस्ताव मागील तीन महिन्यांपासून वाशिम पं.स. मध्ये धूळ खात पडले आहेत. ज्या गावांचा कृती आराखड्यामध्ये समावेश नाही, अशा गावच्या लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे. वाशिम पंचायत समिती अंतर्गत येणार्या ८४ ग्रामपंचायतींने स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत वैयक्तिक शौचालयाचे ८00 प्रस्ताव अनुदान मागणीसाठी मागील तीन महिन्यांपासून सादर केले आहेत; परंतु हे प्रस्ताव तीन महिन्यांपासून वाशिम पं.स. मध्ये धूळ खात पडले आहे. त्यामुळे १२ हजार रुपयांचे अनुदान मिळणार या आशेवर उसनवारीवर पैसे घेऊन शौचालयाचे बांधकाम करणारे नागरिक अडचणीत आले आहे. स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत शौचालय बांधा व घरपोच अनुदान मिळवा असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले होते; मात्र आता अनुदान नसल्याने जिल्हा परिषदेला आपल्याच आश्वासनाचा जणू विसर पडला आहे.