सोयाबीन सुड्या जळून ८० हजारांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 08:12 PM2017-10-03T20:12:13+5:302017-10-03T20:12:32+5:30
मानोरा (वाशिम): तालुक्यातील वटफळ येथील दोन शेतकºयांनी शेतात सोयाबीनची कापणी करुन लावलेल्या सुड्यांना २ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री आग लागून दोन्ही शेतकºयांचे मिळून ८० हजार रुपयांचे सोयाबीन जळून खाक झाले. या प्रकरणी नुकसानग्रस्त शेतकरी हनुमंता शिवराम वाघमारे व केशव शिवराम वाघमारे यांनी मानोरा पोलिसांत ३ आॅक्टोबर रोजी तक्रार दिली आहे. दरम्यान, नुकसानीची पाहणी करून तलाठ्यांनी पंचनामा करीत तहसीलदारांकडे अहवालही पाठविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

मानोरा तालुक्यातील वटफळ येथील शेतकरी हनुमंता शिवराम वाघमारे व केशव शिवराम वाघमारे या दोघा भावांनी शेत सर्व्हे नं.३२/१ मध्ये प्रत्येकी २ एकर प्रमाणे सोयाबीननची पेरणी केली होती. या सोयाबीनची कापणी दोन दिवसांपूर्वी करून त्यांनी शेतात दोन सुड्या लावून ठेवल्या होत्या. या दोन्ही सुड्यांना अज्ञात व्यक्तीने २ आॅक्टोंबर रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान आग लावल्याने सोयाबीन जळून खाक झाले आहे. यामुळे दोन्ही शेतकºयांचे मिळून ८० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, शासनाने या नुकसानी पोटी भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकºयांच्यावतीने होत आहे. जळालेल्या सुड्यांचा पंचनामाना तलाठी व्ही.एम.धोत्रे यांनी केला आहे. या प्रकरणी दोन्ही शेतकºयांनी मानोरा पोलिस स्टेशनला तक्रारही केली आहे.