वाशिम तालुक्यात आढळले ८३ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:41 AM2021-05-23T04:41:36+5:302021-05-23T04:41:36+5:30
वाशिम शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाही, सकाळी ९ ते ११ या वेळेत बाजारपेठेत गर्दी होत आहे. शहरातील लाखाळा ...
वाशिम शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाही, सकाळी ९ ते ११ या वेळेत बाजारपेठेत गर्दी होत आहे. शहरातील लाखाळा परिसर, सिव्हिल लाईन, आययुडीपी कॉलनी यासह अन्य परिसरात रुग्णसंख्या वाढत आहे. शहरातील अल्लाडा प्लॉट- १, सिव्हिल लाईन्स- ३, देवपेठ- २, गव्हाणकरनगर- ३, गोंदेश्वर- १, आययुडीपी कॉलनी- ३, नालंदानगर- १, नवीन आययुडीपी कॉलनी- १, परळकर चौक- १, पोलीस वसाहत- १, रविवार बाजार- १, शुक्रवार पेठ- २, तिरुपती सिटी- १, जवाहर कॉलनी- १, रेल्वे स्टेशन परिसर- २, लोनसुने ले-आऊट- १, शहरातील इतर ठिकाणचे- ३, अंजनखेडा- १, अनसिंग- ५, देवठाणा- २, फाळेगाव- १, हिवरा रोहिला- १, जांभरुण परांडे- २, जांभरुण जहांगीर- ७, जयपूर- १, खरोळा- १, माळेगाव- २, मसला- १, नागठाणा- ४, पिंपळगाव- २, सावरगाव बर्डे- १, सावरगाव जिरे- १, सोनखास- २, सोयता- १, तामसी- २, तांदळी बु.- ५, तोंडगाव- १, उकळीपेन- ७, उमरा कापसे- १, वारला- १, एकांबा- १, उमरा शम.- १, सायखेडा- १ असे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील इतर रुग्णांची माहिती संकलित केली जात असून, संदिग्ध रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी शहरात कुठेही गर्दी करू नये, मास्कचा नियमित वापर करावा, हात वारंवार धुवावे, असे आवाहन तहसीलदार विजय साळवे यांनी केले.