वाशिम जिल्ह्यातील एकूण १३४ प्रकल्पांत सरासरी ८३ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 03:35 PM2018-10-12T15:35:46+5:302018-10-12T15:37:32+5:30
वाशिम : जिल्ह्यातील एकूण १३४ प्रकल्पांत सरासरी ८३ टक्के जलसाठा असून, वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाºया एकबुर्जी या मध्यम प्रकल्पात ९८ टक्के जलसाठा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील एकूण १३४ प्रकल्पांत सरासरी ८३ टक्के जलसाठा असून, वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाºया एकबुर्जी या मध्यम प्रकल्पात ९८ टक्के जलसाठा आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ११ आॅक्टोबरअखेर जिल्ह्यातील प्रकल्पांत बºयापैकी जलसाठा असल्याने रब्बी हंगामात सिंचन होण्याच्या शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. एकबुर्जी, सोनल, अडाण अशा तीन मध्यम प्रकल्पात सरासरी ९५ टक्के जलसाठा आहे. वाशिम तालुक्यातील एकूण ३५ लघु प्रकल्पांत सरासरी ८९ टक्के जलसाठा आहे. सात प्रकल्पाचा अपवाद वगळता उर्वरीत सर्व प्रकल्प पाण्याने तुडूंब आहेत. मालेगाव तालुक्यातील २३ प्रकल्पांत सरासरी ७५ टक्के जलसाठा आहे. मसला खुर्द, सोमठाणा, सोनखास, सुकांडा, खडकी, अडोळ, धारपिंप्री, कुत्तरडोह, मैराळडोह, कोल्ही या प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा आहे. रिसोड तालुक्यातील १८ प्रकल्पांत सरासरी ६३ टक्के जलसाठा आहे. हराळ, वरूड बॅरेज, वाडी रायताळ, वाकद, कुकसा या प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा आहे. मोरगव्हाण या प्रकल्पात केवळ ३ टक्के जलसाठा आहे. जवळा प्रकल्पात ३२, मांडवा प्रकल्पात २६, वाघी प्रकल्पात ४० टक्के जलसाठा आहे.
मंगरूळपीर तालुक्यातील १६ प्रकल्पांत सरासरी ८१ टक्के जलसाठा आहे. दस्तापूर, जोगलदरी, चौरद, कासोळा या प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा आहे. स्वाशिन या प्रकल्पात केवह तीन टक्के, कवठळ ५४, चांदई ६० टक्के तर उर्वरीत प्रकल्पांत ९३ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आहे.मानोरा तालुक्यातील २३ प्रकल्पांत सरासरी ९२ टक्के जलसाठा आहे. हिवरा बु., वाठोद, रूई, रोहणा, रतनवाडी, कार्ली, गिरोली, फुलउमरी, धानोरा भुसे आदी प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा आहे.कारंजा तालुक्यातील १६ प्रकल्पांत सरासरी ७२ टक्के जलसाठा आहे. हिवरा लाहे, मोखेड पिंप्री, बेलमंडळ, बग्गी, झोडगा, उंद्री, वडगाव, किनखेड या प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा आहे. तर गायवळ प्रकल्पात ७ टक्के, ऋषी प्रकल्पात १७ टक्के, धामणी प्रकल्पात ९ टक्के जलसाठा आहे.