निवडणूकीपुर्वीच ८३२ सदस्य, १६ सरपंच अविरोध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 08:13 PM2017-10-05T20:13:00+5:302017-10-05T20:13:27+5:30
वाशिम: येत्या ७ आॅक्टोबरला जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. मात्र, तत्पुर्वीच १२ ग्रामपंचायती अविरोध झाल्या असून ८३२ सदस्य आणि १६ सरपंचही बिनविरोध निवडल्या गेले. यायोगे निवडणूकीत होणाºया अवाजवी खर्चाला तद्वतच राजकीय हेव्यादाव्यांवरून उद्भवणाºया तंट्यांना आपसूकच तिलांजली मिळाल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

जिल्ह्यातील ४९१ पैकी २७३ ग्रामपंचायतींची निवडणूक ७ आॅक्टोबरला होत असून त्यात ३०६६ सदस्य आणि ९१२ सरपंचपदाचे उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. यादरम्यान गावागावातील नागरिकांच्या आपसी सहमतीने तथा सर्वानुमते तब्बल ८३२ सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून १२ सरपंच देखील निवडणूक न लढताच बिनविरोध विजयी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली.