वाशिम जिल्ह्यात ८६ शेतक-यांच्या आत्महत्या

By admin | Published: January 7, 2015 01:06 AM2015-01-07T01:06:34+5:302015-01-07T01:06:34+5:30

मागील वर्षातील शेतक-यांच्या ४७ आत्महत्या अपात्र.

86 farmers suicides in Washim district | वाशिम जिल्ह्यात ८६ शेतक-यांच्या आत्महत्या

वाशिम जिल्ह्यात ८६ शेतक-यांच्या आत्महत्या

Next

वाशिम : नापिकी, कर्जबाजारीसह विविध कारणांमुळे गत वर्षात जिल्हय़ातील ८६ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले. सन २00१ ते २0१४ पर्यंंत एकूण ११३८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. ११३८ शेतकरी आत्महत्यांपैकी केवळ ४0९ आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्यात.
शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सत्र दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतांनाच दिसून येत आहेत. त्यामध्ये शासनाच्यावतीने शेतकरी आत्महत्या अपात्र ठरविल्या जात आहेत. सन २00१ पासून तर २0१४ पर्यंंत झालेल्या ११३८ शेतकरी आत्महत्यापैकी ४0९ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. गतवर्षी नापिकी, सावकारी कर्ज, बँकेचे कर्ज यासह विविध समस्यांचा सामना करताना हतबल झालेल्या शेतकर्‍यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. यामध्ये सन २00१ ते २00८ पर्यंंत ५७७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. तर २00९ ते २0१४ पर्यंंत एकूण ५६१ असे एकूण १४ वर्षात ११३८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची शासनदप्तरी नोंद आहे. यामध्ये २00९ मध्ये एकूण १२१, २0१0 मध्ये १२२, २0११ मध्ये ८९, २0१२ मध्ये ८३, २0१३ मध्ये ६0 तर २0१४ मध्ये ८६ शेतकर्‍यांनी विविध कारणांमुळे आत्महत्या केली. शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत असताना शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढत असून, यावर प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता निर्माण झाली आहे.

*गत ५ वर्षात सर्वाधिक आत्महत्या सन २0१0 मध्ये

शेतकरी आत्महत्यांच्या गत ५ वर्षातील घटना पाहता सन २0१0 मध्ये सर्वाधिक १२२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात. शासनाने यामधील मात्र केवळ २८ शेतकरी आत्महत्याच पात्र असल्याचे ठरविले. इतर ९४ आत्महत्या अपात्र ठरविल्यात.

Web Title: 86 farmers suicides in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.