वाशिम जिल्ह्यात ८८ प्रशासकांनी स्वीकारला ग्रामपंचायतींचा पदभार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 05:35 PM2020-08-26T17:35:09+5:302020-08-26T17:35:23+5:30

२४ ते २६ आॅगस्टदरम्यान मुदत संपणाºया ८८ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांनी पदभार स्वीकारला आहे.

88 administrators take charge of Gram Panchayat in Washim district! | वाशिम जिल्ह्यात ८८ प्रशासकांनी स्वीकारला ग्रामपंचायतींचा पदभार !

वाशिम जिल्ह्यात ८८ प्रशासकांनी स्वीकारला ग्रामपंचायतींचा पदभार !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पाच वर्षांची मुदत संपणाºया जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये २४ आॅगस्ट रोजी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, २४ ते २६ आॅगस्टदरम्यान मुदत संपणाºया ८८ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांनी पदभार स्वीकारला आहे.
जिल्ह्यात एकूण ४९१ ग्रामपंचायती असून, यापैकी १६३ ग्रामंपचायतींमधील विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कालावधी ३१ आॅगस्टपर्यंत संपुष्टात येत आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील २४, मालेगाव तालुक्यातील ३०, रिसोड तालुक्यातील ३४, कारंजा तालुक्यातील २८, मंगरूळपीर तालुक्यातील २५, मानोरा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.  कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुदत संपणाºया ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक नेमण्याच्या शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. एका प्रशासकाकडे केवळ एकाच ग्रामपंचायतीचा कार्यभार सोपविण्यात आला. दरम्यान, २४ ते २६ आॅगस्ट या दरम्यान ८८ ग्रामपंचायतींची मुदत संपली असून, या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज सुरू झाला. ८८ प्रशासकांनी ग्रामपंचायतींचा पदभार स्वीकारला आहे. यामध्ये कारंजा तालुक्यातील १५, वाशिम तालुक्यातील १२, रिसोड तालुक्यातील १७, मंगरूळपीर तालुक्यातील १३, मानोरा तालुक्यातील १५, मालेगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Web Title: 88 administrators take charge of Gram Panchayat in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.