कृषी औजारे बँक स्थापन करण्यासाठी ८८ लाखांचा निधी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 01:14 PM2017-10-18T13:14:28+5:302017-10-18T13:14:43+5:30
वाशिम : उन्नत शेती समृध्द योतकरी या मोहिमे अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान सन २०१७-१८ अंतर्गत जिल्ह्यासाठी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यापैकी औजारे बँक स्थापन करणे या बाबीसाठी दोन लक्ष्यांक असून, या बाबीतंर्गत एकूण खर्चाच्या ४० टक्के शासकीय अनुदान देण्यात येणार आहे.
जिल्ह्यासाठी १० लाखापर्यंतचे ४० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यास एक लक्षांक प्राप्त आहे. तसेच२५ लाखापर्यंतची औजारे बँक स्थापन करणाºयाास १० लाख रुपयापर्यंतचे ४० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी देखील एक लक्षांक प्राप्त आहे. जिल्ह्यातून अद्याप पर्यंत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात औजारे बँकेचा एकच अर्ज प्राप्त झालेला आहे. यासाठी यंत्र औजारांचे कोटेशन व तपासणी प्रमाणपत्र, संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र व लाभार्थी अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असल्यास जातीचे वैध प्रमाणपत्र, आधारकार्ड, संलग्न बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची छायांकित प्रत आदी कागदपत्रासह घेण्याचे तात्काळ तालुका कृषि अधिकाºयांकडे २५ आॅक्टोंबरपर्यंत सादर करावे तसेच याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, वाशिम यांनी केले आहे. जिल्ह्यास देण्यात आलेल्या लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात ३१ आॅक्टोंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.