जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात ९२४९ कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 03:42 PM2018-11-04T15:42:41+5:302018-11-04T15:43:09+5:30
वाशिम: राज्य शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानातर्गंत जिल्ह्यात मागील चार वर्षांत ४६९ गावांत विविध यंत्रणेमार्फत ९२४९ कामे पुर्ण करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्य शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानातर्गंत जिल्ह्यात मागील चार वर्षांत ४६९ गावांत विविध यंत्रणेमार्फत ९२४९ कामे पुर्ण करण्यात आली. यामधून ६७ हजार ३६२ दशलक्ष घनमीटर (टीसीएम) पाणीसाठा निर्माण झाला असून, या आधारे १ लाख १० हजार ५५२ हेक्टर संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.
जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्हयातील शेतकरी आता ठिबक आणि तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करुन पिकांचे उत्पन्न घेत आहे. जलयुक्त शिवार अभियानात सन २०१५-१६ या वर्षात जिल्ह्यातील २०० गावांची निवड पहिल्या वर्षी करण्यात आली. या गावातील शेत शिवारात २२ हजार ६०८ हेक्टरवर ५०५७ कामे पूर्ण करण्यात आली. यामधून ३४ हजार ४१७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला. या पाण्यातून ६८ हजार ८३४ हेक्टर संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली. सन २०१६-१७ या वर्षात १४९ गावांची निवड करण्यात आली. या गावातील शिवारात ८३४३ हेक्टरवर २०६९ कामे पुर्ण करण्यात आली. यामधून २२, ७८६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला. यातून ३३,१७८ हेक्टर संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली. सन २०१७-१८ या वर्षात १२०गावात २१२३ कामे ८७९६ हेक्टरवर करण्यात आली. यामधून १०हजार १५९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला. यामधून ८५४० संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली. सन २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील २५२ गावांची निवड करण्यात आली. यामध्ये ३१२४ कामे प्रस्तावित करण्यात आली असून त्यापैकी २७४ कामे १३३ हेक्टरवर पूर्ण करण्यात आली आहे.