वाशिम नगरपरिषदेची ९४.७४ टक्के करवसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 04:05 PM2019-04-15T16:05:11+5:302019-04-15T16:05:26+5:30
नगरपरिषदेचा कर विभागाने प्रयत्न करुन ९४.७४ टक्के करवसुली केल्याचे त्यांच्या वसुलीच्या आकडेवारीवरुन दिसून येते.
- नंदकिशोर नारे
वाशिम : शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते. मार्च अखेरपर्यंत शंभर टकके करवसुलीसाठी नगरपरिषदेचा कर विभागाने प्रयत्न करुन ९४.७४ टक्के करवसुली केल्याचे त्यांच्या वसुलीच्या आकडेवारीवरुन दिसून येते.
मार्च अखेरपर्यंत १०० टक्के उद्दिष्टपूर्तीसाठी कर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्याधिकारी वसंत इंगोले यांच्या मागदर्शनात सुटीच्यादिवशीही कर्तव्य बजावून मोठया प्रमाणात कराची वसुली केली. समाधानकारक वसुली झाल्याने मुख्याधिकारी वसंत इंगाले यांनी कर विभागातील कर्मचाºयांचा गौरव केला. विशेष म्हणजे ३१ मार्चपर्यंत रात्री उशिरापर्यंत कार्यालय सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, याचा चांगला फायदा होवून त्यादिवशी विक्रमी करवसुली झाल्याची माहिती कर निरिक्षक अ.अजिज अ. सत्तार यांनी दिली.
जिल्हयातील चारही नगरपालिकांमध्ये सर्वाधिक कर वसुली करण्याचे कार्य दरवर्षी वाशिम नगरपरिषदेच्यावतिने करण्यात येते. याहीवर्षी सर्वाधिक करवसुली करुन जिल्हयात एक नंबरवर वाशिमची नगरपालिका राहली. याकरिता कर विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी पुढाकार घेतला आहे.
शहराच्या विकासासाठी कराचा भरणा करणे आवश्यक आहे. सर्व नागरिकांना पुरविण्यात येणाºया सुविधा मिळाव्यात यासाठी कराचा भरणा प्रत्येक नागरिकांनी करणे आवश्यक आहे. मार्च अखेरपर्यंत १०० टक्के उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व करसंग्राहकांनी सुटीच्या दिवशी कामे करुन चांगली वसुली केली. सर्व अधिकारी, कर्मचारी करवसुलीसाठी मोलाचे प्रयत्न आहेत.
-वसंत इंगोले
मुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम