आर्थिक महामंडळांची ९ कोटींची वसुली थकितच 

By admin | Published: March 29, 2017 03:33 PM2017-03-29T15:33:45+5:302017-03-29T15:33:45+5:30

विविध विकास आर्थिक विकास महामंडळांतर्गतच्या थेट कर्ज योजनेतील ९ कोटी रुपयांहून अधिक रकमेची वसुली मागील दोन वर्षांपासून थांबली आहे.

9 crore recoveries of financial corporations are notorious | आर्थिक महामंडळांची ९ कोटींची वसुली थकितच 

आर्थिक महामंडळांची ९ कोटींची वसुली थकितच 

Next

वाशिम :  विविध विकास आर्थिक विकास महामंडळांतर्गतच्या थेट कर्ज योजनेतील ९ कोटी रुपयांहून अधिक रकमेची वसुली मागील दोन वर्षांपासून थांबली आहे.  या रकमेच्या वसुलीसाठी सर्वच विकास महामंडळाचे अधिकारी आता आटापिटा करीत आहेत. 

समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या विविध विकास महामंडळांमार्फत बेरोजगार आणि उद्योगशील व्यक्तींना विविध योजनेत २० हजार ते ३० लाखांपर्र्यंतचे ्रकर्ज देण्यात येते. यामध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्या योजना (एनएसएफडीसी),राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्या योजना (एनएसकेएफडीसी) या दोन मुख्य योजनांतर्गतच्या पोट योजनांतून लाभार्थींना वेगवेगळ्या पद्धतीच्या व्याजावर आधारीत मुदती कर्ज देण्यात येते. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले विकास महामंडळामार्फत  ६५० पेक्षा अधिक लाभार्थींकडे  ५ कोटी ४०  लाख रुपये थकित आहेत. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळांतर्गत थेट कर्ज योजनेत १२० लाभार्थींकडे त्यामधील १ कोटी रुपये थकित आहेत. इतर मागासवगीर्य विकास महामंडळांतर्गत  ३४२ लाभार्थीकडे  २ कोटी ३५  लाख रुपये थकित आहेत. वसंतराव नाईक महामंडळांतर्गत ४८ लाख रुपये, तर अपंग विकास महामंडळांतर्गत जवळपास २५ लाख रुपये आणि संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाक डून वितरित करण्यात आलेल्या कर्जापैकी ४  लाख रुपये मिळून एकूण ९ कोटी ५२ लाख रुपये थकले आहेत.

Web Title: 9 crore recoveries of financial corporations are notorious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.