कारंजातील १४ पैकी ९ सरपंच अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:49 AM2021-02-17T04:49:18+5:302021-02-17T04:49:18+5:30
कारंजा तालुक्यातील निवडणूक पार पडलेल्या २८ ग्रामपंचायतींपैकी १४ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया सोमवारी पार पडल्यानंतर उर्वरित १४ ...
कारंजा तालुक्यातील निवडणूक पार पडलेल्या २८ ग्रामपंचायतींपैकी १४ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया सोमवारी पार पडल्यानंतर उर्वरित १४ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक मंगळवारी घेण्यात आली. त्यात सोहळ ग्रामपंचायत सरपंचपदी ंअरुण सोळंके, तर उपसरपंचपदी चंदन वसंता बोलके यांची यांची अविरोध निवड झाली. गायवळ ग्रामपंचायत सरपंचपदी पुष्पा अरुण राऊत, तर उपसरपंचपदी मंगला बाळकृष्ण व्यवहारे यांची अविरोध निवड झाली. सिरसोली ग्रामपंचायत सरपंचपदी रेखा रामटेके, तर उपसरपंचपदी महेंद्र जुंजराव कराळे यांची अविरोध निवड झाली. कोळी ग्रामपंचायत सरपंचपदी शेख साजेदाबी नसीर, तर उपसरपंचपदी रामकृष्ण लक्ष्मणराव फुके यांची अविरोध निवड झाली. भडशिवणी ग्रामपंचायत सरपंचपदी वर्षा ज्ञानेश्वर अंबाळकर, तर उपसरपंचपदी रवींद्र श्रीकृष्ण लाहे विजयी झाले. कार्ली ग्रामपंचायत सरपंचपदी बेबी समाधान लोडम, तर उपसरपंचपदी सीमा गोवर्धन वाघमारे यांची अविरोध निवड झाली. रामनगर ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत उमिता नितीन चव्हाण यांनी, तर उपसरपंच पदाच्या निवडणुकीत पंकज देविदास चौधरी यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करून विजय मिळविला. राहाटी ग्रामपंचायत सरपंचपदी माधुरी किशोर देशमुख, तर उपसरपंचपदी श्रीकृष्ण भीमराव चिंचे यांची अविरोध निवड झाली. मोहगव्हाण ग्रामपंचायत सरपंचपदी भीमराव शामराव अवताडे, तर उपसरपंचपदी निरंजन किसन जाधव यांची अविरोध निवड झाली. मेहा ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत प्रतिमा प्रमोद बोबडे यांनी प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला, तर उपसरपंचपदी रेखा अशोक मेश्राम यांची अविरोध निवड झाली. दुघोरा ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत ज्योती दीपक बांडे यांनी प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला, तर उपसरपंचपदी विवेक चिंतामणराव बांडे यांची अविरोध निवड झाली. येवता ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत रूपेश देवानंद वानखडे यांनी, तर उपसरपंच पदाच्या निवडणुकीत नंदा संतोष बांते यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करून विजय मिळविला. शिवनगर ग्रामपंचायत सरपंचपदी पद्मा छगन बहाळे, तर उपसरपंचपदी शालिनी लक्ष्मण ठोंबरे यांची अविरोध निवड झाली, तसेच पिंपळगाव बु. ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत शुभांगी भारत गुंजाटे यांनी, तर उपसरपंच पदाच्या निवडणुकीत बेबी पांडुरंग पवार यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करून विजय मिळविला.
-------------
निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात
कारंजा तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीसाठी महसूल व पोलीस प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली होती. तथापि, १४ पैकी ९ ग्रामपंचायतीत सरपंच, तर १० ग्रामपंचायतीत उपसरपंच अविरोध निवडण्यात आल्यानंतर इतरही ग्रामपंचायतीत एकापेक्षा अधिक उमेदवारांनी पदासाठी अर्ज केले असले तरी त्यात कोणताही गोंधळ न उडता निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.