९ रुग्णांचे अतिरिक्त शुल्क परत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:27 AM2021-07-21T04:27:24+5:302021-07-21T04:27:24+5:30
वाशिम : आणखी ९ कोरोनाबाधितांकडून उपचारासाठी अतिरिक्त शुल्क घेण्यात आल्याचे भरारी पथकाच्या हवालामध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त शुल्काची ...
वाशिम : आणखी ९ कोरोनाबाधितांकडून उपचारासाठी अतिरिक्त शुल्क घेण्यात आल्याचे भरारी पथकाच्या हवालामध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त शुल्काची रक्कम संबंधितांना सव्याज परत करण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी मंगळवारी दिले आहेत.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी गतवर्षी सेक्युरा हॉस्पिटल येथे डेडिकेटेड कोविड सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. या ठिकाणी उपचार घेतलेल्या आणखी ९ कोरोनाबाधितांकडून उपचारासाठी अतिरिक्त शुल्क घेण्यात आल्याचे देयक तपासणीसाठी नियुक्त भरारी पथकाने आपल्या हवालामध्ये स्पष्ट झाले आहे. सेक्युरा हॉस्पिटलचे व्यवस्थापक यांनी ९ कोविडबाधित रुग्णांकडून आकारलेली देयकातील नमूद तफावतीची २८ हजार ६५० रुपये रक्कम सदर रुग्णांना सुट्टी मिळाल्यापासून ते आजपावेतो ‘पीएलआर’ दराने म्हणजेच १० मार्च, २०२० पासून १० जून, २०२० पर्यंत १२.९० टक्के दराने व १० जून, २०२० पासून १२.१५ टक्के दराने सदर रक्कम रुग्णांच्या बँक खात्यात पुढील १५ दिवसांत जमा करावी. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा, असा आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिला.