आसेगाव परिसरात ९० टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:25 AM2021-07-05T04:25:22+5:302021-07-05T04:25:22+5:30

^^^^^^^^^^ वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान वाशिम : कामरगाव परिसरात सध्या पिके डोलदार असून, हरिण, माकड आदी वन्यप्राणी पिकांत धुमाकूळ ...

90% sowing in Asegaon area | आसेगाव परिसरात ९० टक्के पेरणी

आसेगाव परिसरात ९० टक्के पेरणी

Next

^^^^^^^^^^

वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान

वाशिम : कामरगाव परिसरात सध्या पिके डोलदार असून, हरिण, माकड आदी वन्यप्राणी पिकांत धुमाकूळ घालत असल्याने पिकांचे नुकसान होत असल्याचे सोमवारी दिसून आले. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली.

--------------

तणनाशक फवारणीत शेतकरी व्यस्त

वाशिम : सध्या खरीप पिकाची पेरणी ५० टक्क्यांवर उरकली असून, पिकात वाढणाऱ्या तणाचा बंदोबस्त करण्यासाठी विविध प्रकारच्या तणनाशकांची फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त असल्याचे ३ ते ४ जुलै दरम्यान दिसून आले.

------

धरणावर वाढली झुडपे

वाशिम : मानोरा तालुक्यातील धानोरा भुसे येथील धरणाच्या भिंतीवर मोठमोठी वृक्ष वाढली असून, मूळ खोलवर जाऊन धरणाच्या भिंतीला धोका उद्भवण्याची भीती आहे.

-------------

ग्रामस्थांना मार्गदर्शन

वाशिम : कारंजा तालुक्यातील उंबर्डा येथे रस्त्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने गावात घाण वाढत आहे. या पृष्ठभूमीवर सरपंचांच्या मार्गदर्शनात ग्राम सचिवांनी गावकऱ्यांना गुरुवारी स्वच्छता राखण्याबाबत मार्गदर्शन केले.

----

Web Title: 90% sowing in Asegaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.