वाशिम जिल्ह्यातील ९ हजार पात्र शेतकरी पीककर्जापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 12:32 PM2020-10-03T12:32:54+5:302020-10-03T12:33:04+5:30
Crop Loan, Farmer in Washim कर्जमाफी संदर्भातील शासन निर्णयाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: मागील जिल्ह्यात यंदा १६०० कोटी रुपयांच्या पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात खूप कमी पीककर्जाचे वितरण बँकांकडून झाले आहे. त्यात पात्र असलेल्या १ लाख १३ हजार शेतकऱ्यांपैकी १ लाख ३ हजार शेतकऱ्यांना अंतीम मुदतीपर्यंत पीककर्ज वितरीत झाले. त्यातच ९ हजार शेतकरी पीककर्जमाफीस पात्र असतानाही त्यांचे यादीत नाव नसल्याने त्यांना पीककर्जापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे कर्जमाफीस संदर्भातील शासन निर्णयाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
जिल्हा प्रशासनाने शासनाच्या २ लाख रुपयांपर्यंत्च्या पीककर्ज मूक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र असलेल्या शेतकºयांची यादी तयार करून ती शासनाकडे पाठविली होती. यात जिल्ह्यातील ९९ हजार शेतकºयांचा समावेश होता. या सर्व शेतकºयांनी यंदाच्या खरीप हंगामासाठीआवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करून बँकाकडे प्रस्ताव सादर केले. त्यामुळे या शेतकºयांना पीककर्ज मिळण्याची आशा होती; परंतु प्रशासनाने शासनस्तरावर सादर केलेल्या यादीतील ९९ हजार शेतकºयांपैकी ९० हजार शेतकºयांची नावे पीककर्ज माफीच्या यादीत आली, तर ९ हजार शेतकºयांची नावे यादीतच आली नाहीत. त्यामुळे पीककर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. पीककर्ज माफीची रक्कमच खात्यावर जमा न झाल्याने त्यांना नव्याने पीककर्ज मिळू शकले नाही. आता हे शेतकरी पीककर्जापासून वंचित राहिले आहेत.
अंतीम मुदतीपर्यंत पात्र असलेल्या आणि कर्जमाफीच्या यादीत समाविष्ट असलेल्या १ लाख २ हजार शेतकºयांना ६३७ कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वितरण बॅकाकडून करण्यात आले. आता प्रस्ताव सादर करणारे आणि पात्र असलेले दीड हजाराच्या जवळपास शेतकºयांना संबंधित बँकाकडून येत्या आठ दहा दिवसांत पीककर्ज वितरीत केले जाणार आहे.
-डी. व्ही निनावकर,
व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक