आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यात ९१ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:41 AM2021-03-05T04:41:44+5:302021-03-05T04:41:44+5:30

शालेय शिक्षण विभागाच्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत नोंदणीसाठी शाळांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्‍याने शिक्षण विभागाने ही नोंदणी प्रक्रिया ...

91 applications in the district for free admission under RTE | आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यात ९१ अर्ज

आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यात ९१ अर्ज

Next

शालेय शिक्षण विभागाच्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत नोंदणीसाठी शाळांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्‍याने शिक्षण विभागाने ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ दिलेली होती. ही वाढीव मुदत मंगळवार२४ फेब्रुवारीला संपली. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील१०३ शाळांनी नोंदणी पूर्ण केलेली आहे. यामध्ये कारंजा तालुक्यातील १६, मालेगाव तालुक्यातील १७, मंगरुळपीर तालुक्यातील १७, मानोरा तालुक्यातील ७, रिसोड तालुक्यातील १८, तर वाशिम तालुक्यातील २८ शाळांचा समावेश आहे. या सर्व शाळांत मिळून २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत ७१८ जागा भरावयाच्या आहेत. या जागांकरीता आॅनलाइन अर्ज क रण्यासाठी ३ मार्चपासून सुरुवात झाली आहेत. त्यात ४ मार्च रोजी सायंकाळपर्यंत केवळ ९१ विद्यार्थ्यांच्या पालकांनी अर्ज केले आहेत.

------------

पालकांनी वेळेत अर्ज करावेत !

२५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील १०३ शाळांची नोंदणी झाली असून, ३ मार्चपासून विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन अर्ज प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. येत्या २१ मार्च रोजी सायंकाळ ५ वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे पालकांनी त्यांच्या पाल्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यासाठी निर्धारित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

------------

कोट: आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेतंर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज प्रक्रि येस बुधवार ३ मार्चपासून सुरुवात झाली आहे. त्यात ९१ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता पालकांनी अर्ज केले आहेत. अर्ज करण्याची शेवटची मुदत २१ मार्च असल्याने पालकांनी निर्धारित मुदतीच्या आतच अर्ज सादर करावेत.

- अंबादास मानकर,

शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. वाशिम

Web Title: 91 applications in the district for free admission under RTE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.