पोक्रा अंतर्गत शेतीशाळांच्या खर्चापोटी ९१ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 05:50 PM2020-07-12T17:50:54+5:302020-07-12T17:51:12+5:30
शासनाने ६ जुलै रोजी ९१ लाखांच्या निधी वितरणास मंजुरी दिली.
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम: राज्यातील १५ जिल्ह्यातील ५१४२ गावांत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा) २०२०-२१ या वर्षांत आयोजित शेतीशाळांच्या खर्चापोटी शासनाने ६ जुलै रोजी ९१ लाखांच्या निधी वितरणास मंजुरी दिली असून, शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून उपविभागीय अधिकारी स्तरावर या निधीचे वितरण केले जात आहे.
राज्य शासनाच्या कृषी, पशूसंवर्धन, दूग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्यावतीने १५ जानेवारी २०१८ च्या निर्णयानुसार १५ जिल्ह्यातील ५हजार १४२ गावांत पोक्रा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पास १८ मे २०२० च्या निर्णयानुसार बाह्य हिस्स्यांतर्गत ७७.९१ कोटी निधी वितरीत करण्यात आलेला आहे. या प्रकल्पातील विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्या राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकाºयांच्या मार्गदर्शनात संबंधित गावांत शेतीशाळांचे आयोजन करण्यात येते. या शेतीशाळांच्या आयोजनापोटी झालेला खर्च अदा करण्यासाठी राज्य शासनाने ९१ लाखांचा निधी ६ जुलै २०२० च्या निर्णयान्वये मंजूर केला आहे. सदर निधी २०२०-२१ या वर्षात आयोजित शेतीशाळांच्या खर्चापोटी शेतीशाळा प्रशिक्षकांचे मानधन, प्रवासखर्च, अल्पोपहार, शेतीशाळा समन्वयकांचे मानधन आदिंसाठीच खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले असून, संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांच्यावतीने उपविभागीय कृषी अधिकारी स्तरावर या निधीचे वितरण केले जात आहे.