वाशिम जिल्ह्यात सोयाबीनची ९५ टक्के पेरणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 03:44 PM2020-07-07T15:44:55+5:302020-07-07T15:45:34+5:30
जिल्ह्यात बियाणे न उगवल्याने अनेकांना दुबार पेरणीचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जून महिन्यापासून तसेच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही जिल्ह्यात झालेल्या हलक्या ते मध्यम पावसानंतर जिल्ह्यातील शेवटच्या टप्यातील पेरण्यांना वेग आला असून, ६ जुलैपर्यंत सरासरी ९२.६० टक्के पेरणी आटोपली. त्यात सोयाबीनचा ९५ टक्के वाटा आहे.
यावर्षी जिल्ह्यात जून महिन्यापासूनच बºयापैकी पाऊस पडत आहे. मध्यंतरी १३ ते २४ जून या दरम्यान पावसाने दडी मारली होती. जिल्ह्यातील पेरण्या सध्या अंतिम टप्प्यात आल्या असून, अनेक भागात सोयाबीन, कपाशीला खतांच्या मात्रा देण्यासह डवरणी, निंदणाची लगबग वाढली आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण पेरणीत सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र आहे. जिल्ह्यात सोयाबीनची ९५ टक्के पेरणी आटोपली आहे. यातील काही शेतकºयांचे बियाणे उगवलेच नसल्याने त्यांना दुबार पेरणीचा फटका सोसावा लागला. बियाणे बोगस निघाल्याने बियाणे कंपन्यांविरोधात शेतकºयांकडून तक्रारीही होत आहेत, त्या अनुषंगाने नुकसानग्रस्त भागात पंचनामेही करण्यात आले. मात्र कारवाईला उशीर होत असल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त केला जात आहे. संकटाच्या या काळातही ९५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यावर्षी कपाशीच्या पेºयातही वाढ झाल्याचे दिसून येते. यामध्ये मानोरा तालुक्यात लक्षणीय वाढ झाली आहे.